ETV Bharat / bharat

माझ्या नवऱ्याने देशसेवा केली, आता त्याला वाचवण्याची जबाबदारी देशाची -पत्नीचे भावनिक आवाहन

नक्षलवाद्यांनी एका जवानाला ओलीस ठेवल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित जवान हा जम्मू काश्मीरमधील रहिवासी आहे. त्याच्या कुटुंबीयांना जवानाच्या सुटेकीच मागणी केली आहे.

जवान
जवान
author img

By

Published : Apr 5, 2021, 2:45 PM IST

Updated : Apr 5, 2021, 5:59 PM IST

रायपूर - छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये 22 जवानांना वीरमरण प्राप्त झाले आहे. यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नक्षलवाद्यांनी एका जवानाला ओलीस ठेवल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित जवान हा जम्मू काश्मीरमधील रहिवासी आहे. त्याच्या कुटुंबीयांनी जवानाच्या सुटकेच मागणी केली आहे.

ओलीस ठेवलेल्या जवानाच्या कुटुंबीयांची सरकारला हाक

ओलीस ठेवलेल्या जवानाचे नाव राकेश्वर सिंह मनहास आहे. राकेश्वर सिंह मनहास हे कोब्रा बटालियनमध्ये होते. राकेश्वर सिंह मनहास यांना एक वर्षाची मुलगी आहे. गेल्या दहा वर्षांपासून राकेश्वर सुरक्षा दलात आहेत. जवानाच्या पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पतीच्या सुटकेची मागणी केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज छत्तीसगडमध्ये असणार आहेत. बीजापूर येथे झालेल्या चकमकीच्या ठिकाणाची ते पाहणी करतील. तसेच, जखमी जवानांनाही ते भेट देणार आहेत.

काय झाले होते?

सुरक्षा दलाच्या 1 हजार 500 जवानांची एक तुकडी बीजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमाक्षेत्रात शोधमोहीम राबवत होती. तर दुसरीकडे नक्षलवाद्यांच्या बाजूने वांछित माओवादी कमांडर आणि 'पीपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मीच्या बटालियन नंबर एक'चा नेता हिडमा आणि त्याची सहकारी सुजाता यांच्या नेतृत्त्वाखाली सुमारे 400 नक्षलवादी एकत्र आले होते. यावेळी सुमारे 400 नक्षलवाद्यांनी दीड हजार जवानांच्या एका तुकडीला घेराव घालत त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता. या चकमकीमध्ये 22 जवानांना वीरमरण प्राप्त झाले. तर या चकमकीत 25 हून अधिक नक्षलवादीही ठार झाल्याची सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह यांनी दिली.

हेही वाचा - असा हल्ला केल्याने ४०० नक्षलवादी पडले १५०० जवानांवर भारी, २२ जवानांना वीरमरण

Last Updated : Apr 5, 2021, 5:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.