फिरोजाबाद : एका गायीसोबत घृणास्पद कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. फिरोजाबाद जिल्ह्यातील शिकोहाबाद येथे राहणारा एक व्यक्ती एका गायीला भाकरी खायला देण्याच्या बहाण्याने बोलावत असे आणि नंतर तिच्यासोबत अत्यंत घृणास्पद कृत्य करत असे. या व्यक्तीच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गुरुवारी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे.
गायीसोबत घृणास्पद कृत्य - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी राजेश यादव हा शिकोहाबाद येथील न्यू यादव कॉलनी येथे राहणारा आहे. तो एका बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून तैनात आहे. एसपी देहाट कुंवर रणविजय सिंह यांनी सांगितले की, पोलिसांना या व्यक्तीबद्दल माहिती मिळाली होती की, तो एका गायीला भाकरी खायला देण्याच्या बहाण्याने बोलावतो आणि तिच्यासोबत घृणास्पद कृत्य करतो. गेल्या दोन वर्षांपासून तो हे कृत्य करत असल्याची माहितीही समोर आली आहे.
आरोपीवर गुन्हा दाखल - तक्रारदाराने या व्यक्तीचा व्हिडिओही बनवला आहे. तो व्हिडिओ पोलिसांना दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कलम 377 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, त्याचवेळी आरोपी फरार झाला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती.
आरोपी अटकेत - गुप्तचराच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला गुरुवारी अटक केली आहे. एसपी देहाट यांनी सांगितले की, अटक आरोपीवर संबंधित कलमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येत आहे. सध्या न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. याप्रकरणी व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनीच आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. शिकोहाबाद पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा -