अमरावती (आंध्र प्रदेश) - कोरोनावर मात करण्यासाठी आता संपूर्ण देशाचे लक्ष कोरोना व्हॅक्सीनकडे लागले आहे. त्यातच सरकारने लस लवकरात लवकर उपलब्ध देणार असे सांगितले आहे. लस उपलब्ध होण्यापूर्वी देशभरातील चार राज्यात लसीकरणाचा ड्राय रन सुरू झाला आहे. यात आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील पाच ठिकाणी ही प्रक्रिया सुरु झाली आहे. ड्राय रनच्या प्रक्रिया राज्यांमध्ये दोन दिवसांसाठी आयोजित केली आहे.
विजयवाडातील सरकारी इस्पितळ, उप्पलुरमधील स्वास्थ्य केंद्र, पूर्णा हार्ट इंस्टीट्यूट, कृष्णावेनी कॉलेज आणि प्रकाश नगर इस्पितळात ड्राय रनला सुरुवात झाली आहे. प्रत्येक केंद्रावर लसीचा ड्राय रन घेण्यासाठी पाच कर्मचारी आणि तीन खोल्याांचा सेटअप करण्यात आला आहे. पहिल्या रुममध्ये रजिस्ट्रेशन, दुसऱ्या रुममध्ये व्हॅक्सीनेशन केले जात आहे.
28 आणि 29 डिसेंबर रोजी चार राज्यात लसीकरणाची ‘ड्राय रन’ घेण्यात येते आहे. यात पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यांचा समावेश आहे. भारतातील ऑक्सफोर्ड लस तयार करणाऱ्या सीरम संस्थेनेही आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज केला होता. आयसीएमआरच्या सहकार्याने लस बनवणारी हैदराबादची कंपनी ‘भारत बायोटेक’ यांनीही लसीचा त्वरित वापर करण्यासाठी अर्ज केला आहे.
जागतिक कोरोना संकटाविरुद्धच्या या लढाईत भारताने अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. गेल्या 6 महिन्यांत कोरोनाच्या नवीन बाधितांच्या दैनंदिन संख्येत लक्षणीय घट होऊन, ही संख्या 20 हजारांपेक्षा कमी झाली आहे. त्याबरोबरच उपचाराखालील रुग्णाची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे.
कोरोना चाचण्यांचा आकडा -
राज्यनिहाय आकडेवारी पाहता, महाराष्ट्रात सर्वांत जास्त 49 हजार 255 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 66, पश्चि बंगालमध्ये 29, केरळात 25 नव्या रुग्णांची नोंद झाली. रविवारी दिवसभरात 7 लाख 15 हजार 397 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. तर आतापर्यंत एकूण 16 कोटी 88 लाख 18 हजार 54 कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत.
हेही वाचा - कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, रिकव्हरी रेट 95.83 वर