ETV Bharat / bharat

लसीकरणाला आजपासून सुरुवात; जाणून घ्या 'कोविशिल्ड' लसीचा प्रवास

author img

By

Published : Jan 15, 2021, 10:23 PM IST

Updated : Jan 16, 2021, 2:16 AM IST

१६ जानेवारीपासून देशात प्रत्यक्ष कोरोना लसीकरणाला प्रारंभ होत आहे. भारत सरकारने ऑक्सफर्ड-अ‌ॅस्त्राझेनेकाच्या 'कोविशिल्ड' आणि भारत बायोटेक कंपनीच्या 'कोव्हॅक्सिन' लसीला परवानगी दिल्यानंतर अनेकांना कोरोनाच्या प्रत्यक्ष लसीकरणाचे वेध लागले होते.

कोविशिल्ड लसीचा प्रवास
कोविशिल्ड लसीचा प्रवास

मुंबई - मार्च २०२० पासून संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूवर विजय मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. शनिवारी १६ जानेवारीपासून देशात प्रत्यक्ष कोरोना लसीकरणाला प्रारंभ होत आहे. भारत सरकारने ऑक्सफर्ड-अ‌ॅस्त्राझेनेकाच्या 'कोविशिल्ड' आणि भारत बायोटेक कंपनीच्या 'कोव्हॅक्सिन' लसीला परवानगी दिल्यानंतर अनेकांना कोरोनाच्या प्रत्यक्ष लसीकरणाचे वेध लागले होते. यातील 'कोव्हिशिल्ड' लसीचा निर्मितीपासूनचा प्रवास कसा झाला हे आपण थोडक्यात पाहुया...

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपीनीने कोव्हिशिल्ड ही कोरोनावरील लस तयार केली आहे. मंगळवारी १३ शहरात ही लस विमानाने दाखल झाली. भल्या पहाटे लसींनी भरलेले कंटेनर विमानतळावर रवाना झाले होते. भारतात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होत आहे.

कोरोना लसीकरण
कोरोना लसीकरण

परवाना मिळण्याआधीच कोट्यवधी डोस

लस निर्मितीमध्ये पुण्यातील सीरम कंपनी जगभरात आघाडीवर आहे. कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर सीरम कंपनीने लस निर्मितीसाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका फार्मा कंपनीसोबत सहकार्य केले. त्यानुसार लसीवर संयुक्तपणे संशोधन करण्यात आले. सोबतच सीरम कंपनीत मोठ्या प्रमाणात लस निर्मिती करण्याची क्षमता आहे. त्यामुळे कोरोना लसीचे उत्पादन सीरमच्या फॅसिलिटीतच करण्यात आले. कंपनीने लसीला परवाना मिळण्याआधीच कोट्यवधी डोस तयार करून ठेवले होते. ही लस शीतगृहात ठेवावी लागते. त्यामुळे त्यासाठी खर्च येतो. आता लसीचा पुरवठा करताना शीत गृहामधूनच लस देशातील विविध शहरात पोहचली आहे. सुरुवातील प्राधान्य गटातील कोरोना योद्ध्यांना लस देण्यात येणार आहे. डॉक्टर, नर्स आरोग्य कर्मचारी यांना सर्वात आधी कोरोना लस देण्यात येणार आहे.

कोरोना लसीकरण
कोरोना लसीकरण

कोरोना लस निर्मिती

ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोविड १९ ही लस प्रोफेसर सारा गिल्बर्ट, अ‌ॅन्ड्र्यू पोलार्ड, तेरेसा लामबे, डॉ. सँडी डगलसस, कॅथरिन ग्रीन आणि अ‌ॅड्रीन हिल यांच्या नेतृत्वाखाली झाली. या पथकात ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांचाही समावेश आहे, ज्यांनी २०१४ साली इबोला संसर्गावर लस निर्मितीत सहभाग घेतला होता.

कोरोना लसीकरण
कोरोना लसीकरण

कोविशिल्ड ही लस पुण्यातील सीरम कंपनीत उत्पादित केली जात आहे. यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका कंपनीचे सहकार्यही घेण्यात येत आहे. इंग्लडमध्ये तयार करण्यात आलेल्या लसीची चाचणी ब्राझील, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि इंग्लमध्ये घेण्यात आली असून आता तेथेही लसीकरण सुरू आहे.

सीरम लसीच्या तिन्ही टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या असून लस कार्यक्षम असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर भारत सरकारने आणीबाणीच्या काळात वापरासाठी लसीला परवाना दिला. या सोबतच भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या लसीलाही आणीबाणीच्या वापरासाठी परवाना दिली आहे. मात्र, ही परवानगी सशर्त असून कोरोना कृती दलाने याबाबत निर्णय घेतला.

कोरोना लसीकरण
कोरोना लसीकरण

लस तयार होण्याची प्रक्रिया काय ?

कुठलीही लस निर्मितीसाठी सुमारे चार वर्षांचा कालावधी लागू शकतो. मात्र, कोरोनावरील लसीसाठी हे काम वेगाने सुरू होते. तसेच चीनने कोरोनाचा जनुकीय अभ्यास जानेवारीतच सुरू केला होता, जेव्हा केवळ चीनमध्येच कोरोनाचा प्रादुर्भाव होता.

एखादी लस तयार करण्यासाठी प्राथमिक चाचण्या करण्यात येतात. या चाचण्यांत लस यशस्वी ठरल्यास 'क्लिनिकल ट्रायल' घेण्यास परवानगी मिळते. पहिल्या टप्यात कमी जणांवर लसीची चाचणी केली जाते. दुसऱ्या टप्प्यात लसीचे वैद्यकीय परीक्षण केले जाते. पुढे ही लस त्या लोकांना दिली जाते ज्यांचे शारीरिक स्वास्थ्य उत्तम आणि वय कमी आहे. तिसऱ्या टप्प्यात लस हजारो लोकांना दिली जाते आणि त्यावरून लसीची परिणामकारकता आणि सुरक्षिततेचे परीक्षण केले जाते. लसीसाठी मंजुरी आणि परवाना मिळण्याचा चौथा टप्पा असतो. सिरम कंपनीने हे चारही टप्पे पार केले असून आणीबाणीच्या काळात वापरासाठी तिला परवानगी मिळाली आहे.

Last Updated : Jan 16, 2021, 2:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.