ETV Bharat / bharat

Thrissur Pooram Festival : केरळ मंदिर महोत्सवात छत्रीवर सावरकरांची प्रतिमा लावल्याने वाद - त्रिशूर पूरमम उत्सवात सावरकरांवरून वादट

केरळमधील प्रसिद्ध त्रिशूर पूरममधील परमेक्कावू देवस्वोम उत्सव रविवारी वादात सापडला. ( Image of Savarkar On Umbrella ) येथील अधिकार्‍यांनी उत्सवाच्या प्रदर्शनात वि.दा. सावरकर यांचे चित्र एका छत्रीत प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून काँग्रेससह, सीपीआने(एम)ने तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर या छत्र्या बाजारातून मागे घेतल्या आहेत.

केरळ मंदिर महोत्सवात छत्रीवर सावरकरांची प्रतिमा लावल्याने वाद

author img

By

Published : May 9, 2022, 8:53 AM IST

त्रिशूर (केरळ) - केरळमधील प्रसिद्ध त्रिशूर पूरममधील परमेक्कावू देवस्वोम हे मंदिर रविवारी वादाच्या भोवऱ्यात सापडले. येथील अधिकार्‍यांनी उत्सवाच्या तयारीदरम्यान दामोदर सावरकर यांचे चित्र एका छत्रीमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. या कृत्यावर काँग्रेस आणि सीपीआय(एम)च्या नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला. ( Savarkar's image on umbrella ) विरोधाकांचा विरोध वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर येथील प्रशासनाने ही छत्री बाजारातून मागे घेतली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

परमेक्कावू देवस्वोम सचिव राजेश यांनी सांगितले की सावरकरांची प्रतिमा महात्मा गांधी, भगतसिंग आणि केरळमधील इतर प्रमुख नेत्यांसह विविध नवजागरण आणि स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांच्या छत्रछायेत आहे. ( Controversy over putting Savarkar's image on umbrella ) जातीय सलोखा किंवा पूरमच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल किंवा सणाच्या धार्मिक सलोख्याला बाधा पोहोचेल असे आम्ही काहीही करणार नाही. आम्हाला त्रिशूर पूरमचे राजकारण करायचे नाही असही ते म्हणाले आहेत.

मंडळाने सावरकरांचे चित्र असलेली छत्री परत घेतली आहे का, यावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. पण एक गोष्ट स्पष्ट केली की, मंदिर व्यवस्थापन अधिकाऱ्यांना यावर कोणताही वाद नको आहे. छत्र्या परमेक्कावू देवस्वोमच्या "चामयम" चा भाग आहेत - मंदिराच्या उत्सवादरम्यान भाजप नेते आणि अभिनेते सुरेश गोपी यांनी प्रदर्शानाचे उद्घाटन केले. काँग्रेस नेत्या पद्मजा वेणुगोपाल यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे, की महात्मा गांधी आणि भगतसिंग यांसारख्या प्रमुख नेत्यांसह सावरकरांच्या प्रतिमेचा समावेश करून संघ परिवाराचा अजेंडा अघड झाला आहे ्सही त्या म्हणाल्या आहेत.

वेणुगोपाल पुढे म्हणतात की "स्वातंत्र्य लढ्याशी गद्दारी करणाऱ्या सावरकरांना महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, भगतसिंग, मन्नत पद्मनाभन आणि चटंबी स्वामीकल यांसारख्या नवजागरण नेत्यांमध्ये सामील करण्याची परवानगी केरळ सरकारने दिली आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. डाव्या सरकारची सत्ता असलेल्या राज्यात संघ परिवाराचा अजेंडा राबविण्यात आला. 'आझादी का अमृत महोत्सव' उत्सवाचा भाग म्हणून केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या यादीच्या आधारे या प्रतिमांची निवड करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या वादावर भाजप आणि संघ परिवाराने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा - Asani Cyclone : चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात दाखल; हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.