नवी दिल्ली: मणिपूरमध्ये अद्यापही शांतता प्रस्थापित झाली नाही. अशातच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आज भेट घेतली. यावेळी काँग्रेस नेत्यांनी मणिपूरमधील परिस्थितीबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन दिले. मणिपूर हिंसाचाराची सेवानिवृत्त किंवा सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी आयोगाकडून चौकशी करावी, अशी मागणी निवदेनात करण्यात आली. यासह एकूण 12 मागण्या काँग्रेसने राष्ट्रपतींकडे केल्या आहेत.
मणिपूरमधील नुकत्याच झालेल्या हिंसाचारावर काँग्रेसने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये म्हटले, की पंतप्रधान स्वतःच्या राज्याभिषेकाने भारावून गेले असताना मणिपूरमध्ये हिंसाचाराची शोकांतिका घडत आहे. मणिपूरमधील हिंसाचारानंतर 25 दिवसांनी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बहुप्रतिक्षित इम्फाळ दौऱ्यावर पोहोचले आहेत. कलम 355 लागू करूनही, मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. मोदींच्या हस्ते संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा स्पष्ट संदर्भ देताना रमेश यांनी म्हटले, की पंतप्रधानांकडून शांततेचे एकही आवाहन करण्यात आलेले नाही. तसेच समाजामध्ये पुन्हा विश्वास निर्माण करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत.
-
Congress president Mallikarjun Kharge, along with a delegation of party leaders, called on President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan in Delhi today.
— ANI (@ANI) May 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(Pics: Rashtrapati Bhavan) pic.twitter.com/8rxSDbX2ix
">Congress president Mallikarjun Kharge, along with a delegation of party leaders, called on President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan in Delhi today.
— ANI (@ANI) May 30, 2023
(Pics: Rashtrapati Bhavan) pic.twitter.com/8rxSDbX2ixCongress president Mallikarjun Kharge, along with a delegation of party leaders, called on President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan in Delhi today.
— ANI (@ANI) May 30, 2023
(Pics: Rashtrapati Bhavan) pic.twitter.com/8rxSDbX2ix
हिंसाचारात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत- मणिपूरमध्ये गेल्या 26 दिवसांपासून जातीय हिंसाचार सुरू असल्याने परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शाह हे ईशान्येकडील राज्याच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी इम्फाळला पोहोचल्यानंतर शाह यांनी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग, सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग, मुख्य सचिव, कॅबिनेट अधिकाऱ्यांसोबत बंद दाराआड बैठक घेतली. या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या बैठकीत गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा उपस्थित होते. हिंसाचारात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.
-
Today we submitted a memorandum to President Droupadi Murmu regarding the situation in Manipur. We have put forth 12 demands, including setting up of a high-level inquiry commission headed by a serving or retired judge of the Supreme Court: Congress pic.twitter.com/t1M7u6Jmo0
— ANI (@ANI) May 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Today we submitted a memorandum to President Droupadi Murmu regarding the situation in Manipur. We have put forth 12 demands, including setting up of a high-level inquiry commission headed by a serving or retired judge of the Supreme Court: Congress pic.twitter.com/t1M7u6Jmo0
— ANI (@ANI) May 30, 2023Today we submitted a memorandum to President Droupadi Murmu regarding the situation in Manipur. We have put forth 12 demands, including setting up of a high-level inquiry commission headed by a serving or retired judge of the Supreme Court: Congress pic.twitter.com/t1M7u6Jmo0
— ANI (@ANI) May 30, 2023
अशी आहे मणिपूरमध्ये व्यवस्था- मणिपूरमध्ये सध्या इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहे. मणिपूरच्या 38 जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त सुरक्षा दल आधीच तैनात करण्यात आले आहेत, तर गेल्या दोन दिवसांत लष्कराने 21 अतिरेक्यांना अटक केली आहे आणि शस्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे. तसेच मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या म्हणण्यानुसार सुरक्षा दलांनी आतापर्यंत 40 दहशतवाद्यांना ठार केले आहे. 3 मेपासून राज्यात हिंसाचार सुरू आहे.पोलिस अधिकार्यांनी सांगितले की, रविवारी सुमारे 40 सशस्त्र अतिरेक्यांनी घरांची जाळपोळ करत सामान्य लोकांवर गोळीबार केला आहे. राज्याच्या विविध भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकींमध्ये दोन जण ठार झाले आणि 12 जण जखमी झाले आहेत.
हेही वाचा-