नवी दिल्ली : काँग्रेस खासदार अब्दुल खालिक यांनी एक वादग्रस्त Congress MP Abdul Khaliq Controversial statement विधान केले आहे. त्यांनी सांगितले आहे की, आम्हांला मुघलांचा अभिमान आहे. कारण त्यांनी भारताला आकार देत हिंदूस्थान बनवले आहे, असे विधान खासदार अब्दुल खालिक यांनी केले आहे.
काँग्रेस खासदार अब्दुल खालिक हे वादग्रस्त विधान करून चर्चेत आले आहेत. आसामचे खासदार अब्दुल खालिक म्हणाले की, मुघलांनी भारताला रास्ता दाखवला. मुघलांनीच भारताची निर्मिती केली आणि प्रथमच देशाला हिंदुस्थान असे संबोधले. मुघलांशिवाय देशाचा स्वातंत्र्यलढा अपूर्ण राहिला असता, असेही ते म्हणाले. मात्र, या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरणही दिले Abdul Khaliq statement Hindusthan Mughal Issue आहे.
काँग्रेस खासदार अब्दुल खालिक म्हणाले, 'मी ट्विट केलेले नाही. मी एका ट्विटवर प्रतिक्रिया दिली होती. आता ते व्हायरल झाले आहे, मी काय करू? होय, मी अजूनही म्हणतो की, मुघल शासकांनीच भारताला पहिल्यांदा हिंदुस्थान म्हटले. त्यापूर्वी या देशाला कोणी हिंदुस्थान म्हटले नव्हते. पूर्वी छोटी राज्ये होती. मुघलांच्या अधिपत्याखाली भारताला आकार मिळाला. जेथे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण सर्व तेथे आहे. Congress MP Abdul Khaliq Controversial statement regarding Hindusthan from Mughal Issue