ETV Bharat / bharat

Sachin Pilot News: राजस्थानमधील काँग्रेसंतर्गत वाद मिटेना... सचिन पायलट 11 जूनला करणार मोठी घोषणा करण्याची शक्यता

काँग्रेसचे अध्यक्ष यांनी मध्यस्थी करूनही राजस्थान काँग्रेसमधील गटबाजी संपल्याची चिन्हे दिसत नाहीत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात राजकीय वाद मिटला नाही. 29 मे रोजी दिल्लीत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या मध्यस्थीनंत वादाबाबत कोणताही फॉर्म्युला आलेला नाही. त्यामुळे आता सचिन पायलट काय पाऊल उचलतात याकडे संपूर्ण देशाचे राजकीय लक्ष लागलेले आहे.

Sachin Pilot News
सचिन पायलट अशोक गेहलोत वाद
author img

By

Published : Jun 6, 2023, 12:52 PM IST

जयपूर: मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील राजकीय वाद थांबवण्यासाठी 29 मे रोजी काँग्रेसची माजी अध्यक्ष राहुल गांधी व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठक घेतली. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याबरोबर झालेल्या ४ तासांच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचे मान्य केले.

सचिन पायलल यांनी आपल्याच सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. यामध्ये वसुंधरा राजे सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराची चौकशी, आरपीएससीमध्ये ( राजस्थान सेवा परीक्षा आयोग) महत्त्वाचे बदल आणि पेपरफुटीमुळे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई अशा मागण्या आहेत. या तीन मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण राज्यात आपल्याच सरकारविरोधात आंदोलन करू, असा इशाराही सरकारला दिला होता. सचिन पायलट यांनी 31 मे रोजी आपल्या मागण्यांवर कृती करावी, असे म्हटले होते. त्यावर गेहलोत सरकारकडून कोणतीच कारवाई झाली नसल्याने पायलट हे वेगळी भूमिका घेऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

11 एप्रिलला उपोषण, 11 मे रोजी पदयात्रा, आता 11 जूनला काय? : माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी सचिन पायलट यांनी 11 एप्रिलपासून रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यानंतर देशभरात चर्चा झाली. 11 एप्रिल रोजी सचिन पायलट यांनी जयपूरमध्ये एकदिवसीय उपोषण करूनही कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे सचिन पायलट यांनी 11 मे रोजी अजमेर ते जयपूरमध्ये पदयात्रा काढली.

राजेश पायलट यांची 11 जूनला पुण्यतिथी : राजस्थानमध्ये आता 11 जूनला म्हणजे सचिन पायलट यांचे वडील राजेश पायलट यांच्या पुण्यतिथीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. हा दिवस पायलट यांच्यासाठीही महत्त्वाचा आहे. बदलेल्या राजकीय परिस्थितीत 11 जूनपर्यंत परिस्थिती बदलली नाही तर पायलट महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. सचिन पायलट यांनी स्वतंत्र पक्षाची घोषणा केली तर राजस्थानमध्ये मोठी खळबळ ठरू शकणार आहे.

हेही वाचा-

  1. Ashok Gehlot Vs Sachin Pilot : राहुल गांधींचे भावनिक आवाहन; गेहलोत-पायलट एकत्र
  2. Jan Sangharsh Padayatra: सचिन पायलट यांची जनसंघर्ष यांत्रा! म्हणाले, यात्रा व्यक्तीविरोधात नसून भ्रष्टाचाराच्या विरोधात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.