पणजी - गोवा विधानसभा निवडणुकीच्या ( Goa Assembly 2022 election update ) पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या राणे पिता-पुत्रांच्या वादावर ( Rane Father Son in Goa election ) अखेर पडदा पडला. निवडणुकीच्या रिंगणातून प्रतापसिंह राणे यांनी माघार घेतली ( Pratap Singh will not contest election ) आहे.
आपल्याला तिकीट मिळालेच नाही
माजी मुख्यमंत्री आणि पर्येंचे आमदार वडील प्रतापसिंह राणे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवू नये, अशी इच्छा त्यांचे पुत्र आरोग्यमंत्री विश्वजित राणे ( Vishwajit Rane on father as candidate ) यांनी व्यक्त केली होती. मात्र, विधानसभा निवडणूक लढविण्याचा मागणीवर प्रतापसिंह राणे ठाम राहिले होते. आगामी विधानसभा निवडणूक सिनियर राणे अर्थातच वडील प्रतापसिंह राणे यांच्याविरोधात लढविणार असल्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले होते. यानंतर एका राजकीय वादाला सुरुवात झाली होती. हा वाद वडील विरुद्ध मुलगा यापेक्षा भाजप विरुद्ध काँग्रेस असा रंगला होता.
हेही वाचा-Goa Assembly Elections 2022 : डिचोली मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला, काँग्रेस कमकुवत
काँग्रेस तोंडघशी पडले
काँग्रेस विरुद्ध भाजप असा सुरू झालेला वादात काँग्रेसने कोणत्याही क्षणाचा विचार न करता त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. प्रतापसिंह राणे हे अधिकृतपणे काँग्रेस उमेदवार असल्याचे पक्षाने घोषित केले. मात्र आपल्या उमेदवारीवर अद्याप शिक्कामोर्तब झाले नाही, असे खुद्द प्रतापसिंह राणे यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष तोंडघशी पडल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
हेही वाचा-Goa Assembly Elections 2022 : गोव्यातील सध्याच्या घडीचे संख्याबळ आणि पक्षाची आजची स्थिती काय, यावर विशेष रिपोर्ट...
मी निवडणूक लढविणार नाही- प्रतापसिंह राणे
काँग्रेस पक्षाने अद्याप मला उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळे अद्यापही माझा निवडणूक लढविण्याचा कोणताही विचार नाही. कार्यकर्ते आणि पक्ष यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे माजी मुख्यमंत्री आणि पर्येंचे आमदार प्रतापसिंह राणे ( Pratapsingh Rane on congress election ticket ) यांनी सांगितले.
हेही वाचा-Goa Assembly Election : गोव्यात राणे पिता पुत्रांचा राजकीय संघर्ष पेटला