नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 152 वी जयंती आहे. महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला होता. दरम्यान, आज दिल्लीतील राजघाटावर अनेक दिग्गज नेत्यांनी गांधीजींना आदरांजली अर्पण केली आहे.
- काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजघाटावर महात्मा गांधींना पुष्पांजली अर्पण केली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर महात्मा गांधींना पुष्पांजली अर्पण केली. तसेच, 'राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र श्रद्धांजली. पूज्य बापूंचे जीवन आणि आदर्श देशाच्या प्रत्येक पिढीला कर्तव्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देत राहील', असे ट्विटही मोदींनी केले आहे.
- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.
- लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.
- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही राजघाटावर महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या 117 व्या जयंतीनिमित्त विजय घाट येथे पुष्पांजली अर्पण केली.
- महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंतीनिमित्त गुजरातच्या साबरमती आश्रमात प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा - Gandhi Jayanti 2021 : महात्मा गांधीजी यांची कधीही न पाहिलेली छायाचित्रे... पाहा एका क्लिकवर