ETV Bharat / bharat

2024 Lok Sabha Election : कॉंग्रेसचा फोकस दक्षिणेकडील राज्यांवर, तरच देऊ शकतील 2024 मध्ये भाजपला टक्कर

author img

By

Published : Jul 30, 2023, 9:48 PM IST

2024 लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने दक्षिणेकडील पाच राज्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. या पाच राज्यांतून 129 सदस्य लोकसभेत जातात. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या राज्यांच्या निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत. (2024 Lok Sabha Election).

Congress
काँग्रेस

नवी दिल्ली : मणिपूर मुद्द्यावरून संसदेत गोंधळ सुरू असताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे दक्षिणेकडील पाच राज्यात लोकसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. ही पाच राज्ये मिळून लोकसभेत 129 सदस्य पाठवतात. (2024 Lok Sabha Election).

कॉंग्रेसची 2024 साठी तयारी सुरू : पक्षाच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार, खरगे कॉंग्रेसच्या राष्ट्रीय आणि राज्यांच्या टीमसोबत 1 ऑगस्टला केरळ, 2 ऑगस्टला कर्नाटक आणि 3 ऑगस्टला तामिळनाडूचा आढावा घेतील. नंतर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या नेत्यांनाही आमंत्रित केले जाऊ शकते. 2024 लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची तयारी करण्यासाठी खरगे यांनी संबंधित राज्यातील नेत्यांसोबत आढावा सत्र सुरू केले आहे.

कर्नाटककडे विशेष लक्ष : कर्नाटकात दणदणीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसने आता दक्षिण भारताकडे आपले लक्ष वळवले आहे. सध्या हा संपूर्ण भाग भाजपमुक्त आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर खरगे यांनी राज्य युनिटचे प्रमुख डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले. आता 2024 मध्ये राज्यातील लोकसभेच्या जागांवर विक्रमी विजय मिळवण्याचे कामही त्यांच्यावर सोपवण्यात आले आहे. कर्नाटकातून लोकसभेत 28 सदस्य जातात. यापैकी भाजपकडे 25 आहेत. तर काँग्रेस, जेडीएस आणि अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.

..म्हणून बंगळुरूत बैठक झाली : 'यावेळी आम्हाला सर्व 28 जागा जिंकायच्या आहेत. त्यासाठीची रणनीती वेळेत तयार केली जाईल. विधानसभा निवडणुकीत खेळ बदलला आणि भाजपचा पर्दाफाश झाला', असे कर्नाटक कॉंग्रेसचे प्रभारी सचिव अभिषेक दत्त म्हणाले. पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनुसार, दक्षिण भारताला एक मजबूत संदेश देण्यासाठी कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे विरोधी पक्षांची दुसरी बैठक घेण्यात आली होती.

केरळकडून कॉंग्रेसला आशा : दुसरीकडे, केरळकडून देखील कॉंग्रेसला चांगल्या आशा आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने येथे 20 लोकसभा जागांपैकी 19 जागा जिंकल्या होत्या. केरळच्या वायनाडमधून राहुल गांधी विक्रमी मताधिक्याने विजयी झाले होते. तसेच गेल्या वर्षी राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेलाही केरळमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. 'आम्ही पुढील वर्षी 2019 च्या निकालांची पुनरावृत्ती करू', असे केरळचे कॉंग्रेस प्रभारी तारिक अन्वर म्हणाले.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज : सध्या कॉंग्रेसला आंध्र प्रदेश आणि तेलंगणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. तेथे पुन्हा पकड मिळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. 2019 मध्ये, बीआरएसने तेलंगणातील एकूण 17 लोकसभेच्या 9 जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसला 3, भाजपला 4 आणि एआयएमआयएमला एक जागा मिळाली. खरगे यांनी ग्राउंड रिपोर्ट्स तयार करण्यासाठी तेलंगणातील सर्व 17 संसदीय जागांवर कॉंग्रेस निरीक्षक आधीच तैनात केले आहेत. ते 2024 च्या निवडणुकीच्या रणनीतीसाठी वापरले जातील.

तामिळनाडूमध्ये अधिक जागा मागण्याची शक्यता : आंध्र प्रदेशमध्ये, वायएसआरसीपीने लोकसभेच्या एकूण 25 पैकी 22 जागा जिंकल्या होत्या. येथे काँग्रेससमोर आव्हान कायम आहे. तामिळनाडूमध्ये, 2019 च्या निवडणुकीत डीएमके-काँग्रेस आघाडीने एकूण 39 लोकसभा जागांपैकी 38 जागा जिंकल्या. काँग्रेसने 9 जागांवर निवडणूक लढवली आणि 8 जिंकल्या. राज्यात आघाडी मजबूत होत असल्याने काँग्रेस आता द्रमुककडे अधिक जागा मागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. Manipur Violence : 'मन की बात' नको, 'मणिपूर की बात' करा; 11 वर्षीय मुलीची पंतप्रधान मोदींना साद
  2. Ramdas Athawale : 'तुम्ही कधीही आमच्यासोबत येऊ शकता', आठवलेंची नितीश कुमारांना थेट ऑफर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.