कन्याकुमारी : काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी बुधवारी कन्याकुमारीमध्ये भारत जोडो यात्रेला हिरवा झेंडा (Rahul Ganghi Flaged OFf Bharat Jodo Yatra) दाखवला. भारत जोडो यात्रा दक्षिण ते उत्तर भारत 3,570 किमी अंतर कापल्यानंतर काश्मीरमध्ये संपेल. काँग्रेसने 'मिले कदम जुडे वतन' या यात्रेसाठी एक नाराही तयार केला आहे.
भारत जोडो यात्रा ही काँग्रेससाठी ऐतिहासिक प्रसंगी आहे, आमच्या संघटनेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास आहे," काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) म्हणाल्या, "मी दररोज विचार आणि भावनेने सहभागी होणार आहे, असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
'काँग्रेस जोडो' यात्रेने पक्षाचे भले होईल, असे म्हणत भाजप यात्रेची खिल्ली उडवत आहे. ही यात्रा दोन भावंडांसाठी (राहुल आणि प्रियंका गांधी) आहे आणि इतर कोणीही त्यात सहभागी होणार नाही, असा दावाही भाजपने केला आहे. तत्पूर्वी आज काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी (Former Prime Minister Rajiv Gandhi) यांच्या तामिळनाडूतील श्रीपेरुंबदूर येथील स्मारकाला भेट दिली.