ETV Bharat / bharat

Cold Storage Accident In Sambhal : कोल्ड स्टोरेजचे छत कोसळल्याने 8 जणांचा मृत्यू, 11 जणांना वाचवण्यात यश - संभलमध्ये कोल्ड स्टोरेजचे छत कोसळले

उत्तर प्रदेशच्या चांदौसी येथील बटाट्याने भरलेल्या कोल्ड स्टोरेजचे छत अचानक कोसळले. छताच्या ढिगाऱ्याखाली काम करणारे अनेक मजूर गाडले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त करत जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Cold Storage Accident In Sambhal
संभलमध्ये कोल्ड स्टोरेजचे छत कोसळले
author img

By

Published : Mar 17, 2023, 9:24 AM IST

संभल (उ. प्रदेश ) : उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील चांदौसी भागात गुरुवारी झालेल्या कोल्ड स्टोरेज दुर्घटनेत आतापर्यंत 8 मजुरांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी इस्लाम नगर रोडवरील कोल्ड स्टोरेज चेंबरचे छत अचानक कोसळले. त्यामुळे 50 हून अधिक मजूर ढिगाऱ्याखाली दबले गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्याचबरोबर एनडीआरएफचे बचावकार्य देखील सुरू आहे. शुक्रवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने एक बुलेटिन जारी केले, त्यानुसार रात्री दीड वाजेपर्यंत 8 मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.

  • Sambhal cold storage godown collapse | Death toll rises to 8, some persons are still missing; teams of NDRF and SDRF engaged in search & rescue operation. 11 people rescued so far: Moradabad DIG Shalabh Mathur pic.twitter.com/jsKOu65ul8

    — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

17 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले : मुरादाबादचे डीआयजी शलभ माथूर यांनी सांगितले की, संभल शीतगृह गोदामाच्या विध्वंसातील मृतांची संख्या 8 वर गेली आहे. काही लोक अजूनही बेपत्ता आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक शोध आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. एनडीआरएफच्या टीमने आतापर्यंत 17 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी ६ मजुरांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

संतप्त नागरिकांची प्रशासनाशी झटापट : या घटनेनंतर संतप्त लोकांनी कोल्ड स्टोरेजच्या केबिनची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. यासाठी सुमारे आठ जेसीबी तैनात करण्यात आले आहेत. यावेळी नागरिकांची पोलिस प्रशासनाशी झटापटही झाली. जेसीबीद्वारे मदतकार्य संथ गतीने होत असल्याचा आरोप त्यांनी केला. अधिकाऱ्यांनी त्यांना समज देऊन शांत केले.

योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शीतगृहात झालेल्या या दुर्घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकांना घटनास्थळी मदतकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संभलचे डीएम मनीष बन्सल यांनी सांगितले की, आत्तापर्यंत 17 जणांना वाचवण्यात यश आले आहे. या दूर्घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ प्रशिक्षित श्वानांच्या मदतीने अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहे. रात्रभर बचावकार्य सुरू होते. ढिगाऱ्याखाली अजूनही दोन मजूर दबले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा : Fire In Secunderabad : सिकंदराबादच्या स्वप्नलोक संकुलाला भीषण आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.