ETV Bharat / bharat

CM Yogi Adityanath : हैदराबादच्या चारमिनार येथील श्री भाग्यलक्ष्मी मंदिरात मुख्यमंत्री योगींकडून पूजा

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीत ( BJP National Executive Meeting )सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हैदराबादला पोहोचले आहेत. रविवारी सकाळी चारमिनार परिसरात असलेल्या श्री भाग्यलक्ष्मी मंदिरात प्रार्थना केली.

Yogi Adityanath
योगी आदित्यनाथ
author img

By

Published : Jul 3, 2022, 11:03 AM IST

हैदराबाद - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Chief Minister Yogi Adityanath ) यांनी रविवारी सकाळी हैदराबादच्या ( CM Yogi in Hyderabad )चारमिनार भागातील श्री भाग्यलक्ष्मी मंदिरात पूजा केली. कडेकोट बंदोबस्तात मुख्यमंत्री योगी चारमिनार परिसरात असलेल्या श्री भाग्यलक्ष्मी मंदिरात पोहोचले. या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीत सहभागी होण्यासाठी सीएम योगी हैदराबादला पोहोचले आहेत.

राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक - हैदराबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक ( BJP National Executive Meeting ) सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi in Hyderabad ) यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन केले. कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पहिल्या रांगेत बसले आहेत. हैदराबादला पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, "भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी हैदराबाद या गतिमान शहरात उतरलो. या बैठकीत आम्ही पक्षाला आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने अनेक मुद्द्यांवर चर्चा करू. " असे त्यांनी सांगितले.

Yogi Adityanath
योगी आदित्यनाथ

पंतप्रधान मोदी संबोधित करणार - पंतप्रधान मोदी राष्ट्रीय कार्यकारिणीलाही संबोधित करणार आहेत. आगामी काळात पक्षाच्या वाटचालीसाठी चर्चा करणार आहेत. विशेषत: गुजरातसारख्या मोठ्या राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. कोविड-19 नंतर पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांच्या पूर्ण सहभागाने बैठक होत आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये झालेल्या शेवटच्या बैठकीत नेते व्हिडीओ कॉंफरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. भाजपच्या या बैठकीपूर्वी हैदराबाद शहरात पक्षाचे झेंडे आणि बॅनर लावण्यात आले आहेत. पोस्टर्समध्ये केंद्र सरकारच्या कामगिरीचे प्रदर्शन करण्यात आले आहे.

इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर - हैदराबादच्या इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ही बैठक होत आहे. यामध्ये पीएम मोदींसोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, १९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे इतर वरिष्ठ नेते सहभागी होत आहेत. बैठकीपूर्वी पक्षाच्या उपाध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे ( Former Chief Minister Vasundhara Raje ) यांनी सांगितले की, बैठकीत 2 प्रस्ताव पाठवले जातील. एक राजकीय प्रस्ताव आहे आणि दुसरा अर्थव्यवस्थेचा आणि गरीब कल्याणाचा आहे. तसेच 'हर घर तिरंगा'च्या सरावावर चर्चा करण्यासाठी हैदराबादमध्ये भाजपची बैठक होत आहे. २० कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याची आमची योजना आहे. असे त्यांनी सांगितले

  • #WATCH | Telangana: Uttar Pradesh Chief Minister and BJP leader Yogi Adityanath offers prayers at Shri BhagyaLaxmi Mandir, Charminar in Hyderabad. pic.twitter.com/VskBaSBRYE

    — ANI (@ANI) July 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - Operation Sarhad : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे तिघे अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.