भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF Recruitment 2022) (CISF) ने ( jobs for 10th pass candidates) विविध ट्रेडमध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) च्या एकूण 787 पदांच्या (787 Posts) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, स्वयंपाकी, मोची, शिंपी, न्हावी, धोबी, सफाई कामगार, पेंटर, गवंडी, प्लंबर, माळी, वेल्डर अशा एकूण 779 पदे आणि हवालदार आणि न्हावी अशा 8 अनुशेषांची एकूण 787 पदे भरती होणार आहेत. एकूण घोषित पदांपैकी 69 पदे महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत, तर 641 पुरुष उमेदवारांसाठी आणि 77 माजी सैनिकांसाठी आहे. Job Recruitment
20 डिसेंबरपर्यंत करा अर्ज : CISF द्वारे (CISF Recruitment 2022) जाहिरात केलेल्या कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदांसाठी अर्ज करणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत भरती पोर्टल, cisfrectt.in वर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतील. अर्ज प्रक्रिया 21 नोव्हेंबरपासून सुरू झालेली आहे आणि उमेदवार 20 डिसेंबर 2022 पर्यंत (Apply by December 20) अर्ज सादर करू शकतात. अर्जादरम्यान, उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून 100 रुपये विहित शुल्क भरावे लागेल. तथापि, एससी, एसटी आणि इएसएम उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही, कारण त्यांना संपूर्ण सूट देण्यात आली आहे.
भरतीसाठी पात्रता : CISF कॉन्स्टेबल (ट्रेडसमन) भरती अधिसूचनेनुसार, अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक (10वी) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. 1 ऑगस्ट 2022 रोजी उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. केंद्र सरकारच्या नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. पुरुष उमेदवारांची किमान उंची 165 सेमी असावी. महिलांसाठी किमान उंची 155 सेमी आहे. Job Recruitment