ETV Bharat / bharat

आयुष्याचा जोडीदार निवडत आहात? मग कांदेपोह्याच्या कार्यक्रमाला हे प्रश्न जरूर विचारा…

आयुष्याचा जोडीदार (Choosing a life partner) निवडताना खूप काळजी घ्यावी लागते. सगळ्यांचेच लव्ह मॅरेज (Love Marriage) होत नाही. मग ठरवून लग्न करण्याच्या प्रक्रियेत मुलगा-मुलगी बघणे कार्यक्रम होतो म्हणजेच कांदेपोह्याच्या कार्यक्रम होतो. त्या काही मिनीटांच्या भेटीत हाच आपला योग्य जोडीदार आहे हे कसे ओळखावे हा मोठा प्रश्न (How to take decision) असतो. वाचा या प्रश्नाचे उत्तर...

Choosing a life partne
आयुष्याचा जोडीदार निवडत आहात?
author img

By

Published : Oct 24, 2022, 10:29 AM IST

सहसा मुलींना प्रौढ, काळजी घेणारे (Caring Person), सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र मुले आवडतात. कधीकधी मुलींना साधे व्यक्तिमत्त्व असणारीही व्यक्ती आवडते. त्यांच्या आवडी-निवडी जाणून घेतल्यास तुम्ही त्यांच्यासाठी योग्य जोडीदार होऊ शकता की नाही हे जाणून घेऊन तुम्हाला योग्य निर्णय घेणे सोपे होईल.

व्यक्तिमत्त्वाबद्दल समजून घेताना त्याच्या आवडी-निवडीबद्दल तपशील मिळवावा. उदाहरणार्थ, त्यांचे छंद काय आहेत? त्यांना काय आवडते? आवडीनिवडी जाणून घेतल्यामुळे तुम्हाला त्यांच्या आणि तुमच्या आवडीनिवडींचा अंदाज येईल.

अनेकवेळा मुलगा मांसाहारी (Non-vegetarian) असतो आणि मुलगी शाकाहारी (vegetarian) असते. किंवा बरोबरच याच्या उलटे असते. अशावेळी आहाराच्या सवयींमुळे लग्नानंतर अडचणी निर्माण होऊ शकतात. मुलगा असो किंवा मुलगी, तुम्ही तुमच्या भावी जीवनसाथीला हा प्रश्न जरूर विचारला पाहिजे.

लग्नानंतर (After Marriage) मुलांचे भविष्य कशाप्रकारे असेल यावरही चर्चा करायला हवी. तसेत मुलांच्या शिक्षणाचा किंवा इतर खर्च कशाप्रकारे करणार यावरही आवर्जून बोलायला हवे.

प्रत्येक व्यक्ती निश्चितपणे विचार करते की, लग्नानंतर त्याला कोणत्या प्रकारचे जीवन (Life after marriage) जगायचे आहे. प्रत्येक मुलीची तिच्या संसारासंदर्भातील काही कल्पना असते, अपेक्षा आणि भविष्यातील योजना असतात. तुमची तुमच्या जोडीदाराची अपेक्षा आणि मुलीची अपेक्षा या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्यानंतर तुम्ही निर्णय घेऊ शकता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.