बीजिंग (चीन) COVID-19 infections rebound in January : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच देशभरातील वैद्यकीय संस्थांमधील तापेची लक्षणं असलेल्या रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. परंतु, चीनमध्ये जानेवारीमध्ये कोविड-19 संसर्गात पुन्हा वाढ होणार असल्याची शक्यता असल्याचं चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
रुग्णसंख्येत चढ-उतार : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे प्रवक्ते एम आय फेंग यांनी रविवारी (14 जानेवारी) पत्रकार परिषदेत सांगितलं की, 2024 च्या सुरुवातीपासून, देशभरातील वैद्यकीय संस्थांमधील तापाच्या दवाखान्यांमध्ये प्राप्त झालेल्या रुग्णांची कमी-जास्त होत आहे. सध्या, श्वसनाचे आजार अजूनही मुख्यतः इन्फ्लूएन्झा आणि कोविड-19 चा संसर्ग तुलनेने कमी पातळीवर आहे. एकूणच चीनमधील वैद्यकीय सेवा सध्या स्थिर आणि व्यवस्थित आहे.
"मल्टी-चॅनल मॉनिटरिंग सिस्टमच्या डेटावरून असं दिसून आलं की नवीन वर्षाच्या सुट्टीनंतर सेंटिनल हॉस्पिटल्समध्ये कोविड-19 विषाणू चाचणीचा पॉझिटिव्ह दर एक टक्क्यांपेक्षा कमी राहिला. जेएन.1 व्हेरिएंटच्या प्रमाणात वाढ दिसून आली"- वांग दयान, चायना नॅशनल इन्फ्लुएंझा सेंटर, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर व्हायरल डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन, चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (चीन सीडीसी) चे संचालक.
इन्फ्लूएंझा लसीकरण करणं गरजेचं : यासंदर्भात अधिक माहिती देत चीन सीडीसीचे संचालक वांग दयान म्हणाले की, गेल्या तीन आठवड्यांत, दक्षिणेकडील प्रांतांमध्ये इन्फ्लूएंझा बी विषाणूचे प्रमाण 36.8 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. गेल्या पाच आठवड्यांत, उत्तर प्रांतांमध्ये हे प्रमाण 57.7 टक्क्यांपर्यंत वाढलं आहे. काही प्रांतांमध्ये, इन्फ्लूएंझा बी विषाणूचे प्रमाण इन्फ्लूएंझा ए पेक्षा जास्त आहे. तसंच अगोदर इन्फ्लूएंझा ए झालेल्या रुग्णाला इन्फ्लूएंझा बीची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळं उच्च जोखीम असलेल्या व्यक्तींनी दरवर्षी शक्य तितक्या लवकर इन्फ्लूएंझा लसीकरण केले पाहिजे.
वेळीच उपचार घेणं आवश्यक : पेकिंग युनिव्हर्सिटी फर्स्ट हॉस्पिटलच्या संसर्गजन्य रोग विभागाचे संचालक वांग गुईकियांग यांनी सांगितलं की, हिवाळा हा श्वसनाच्या संसर्गजन्य रोगांचा सर्वोच्च काळ असल्यानं विविध रोगजनकांच्या संसर्गानंतर निर्माण झालेली प्रतिकारशक्ती दीर्घकाळ टिकत नाही. त्यामुळं वारंवार संक्रमण होऊ शकते. तसंच वृद्ध आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांवर याचा अधिक प्रभाव पडू शकतो. त्यामुळं अशा लोकांनी जास्तीत-जास्त काळजी घेणं आणि वेळीच उपचार घेणं आवश्यक आहे.
हेही वाचा -