ETV Bharat / bharat

मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर साचली घाण.. महापालिकेने ठोठावला दहा हजाराचा दंड..

author img

By

Published : Jul 23, 2022, 8:20 PM IST

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानाजवळ घाण आढळल्याप्रकरणी चंदीगड महापालिकेने 10 हजार रुपयांचे चलन कापले ( Chandigarh MC Challan on cm Residence ) आहे. एका आठवड्यात चलन भरता येईल, असे महामंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Punjab CM Bhagwant Mann
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान

चंदीगड ( पंजाब ) : चंदीगड महापालिकेने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानाला दंड ठोठावला ( Chandigarh MC Challan on cm Residence ) आहे. चंदीगड महापालिकेने सेक्टर-२ मध्ये असलेल्या ७ क्रमांकाच्या घराचे चलन कापले आहे. कोठी क्रमांकाच्या पाठीमागील कचरा आणि अस्वच्छता यामुळे महापालिकेने हे पाऊल उचलले आहे.

10 हजार रुपये दंड: चंदीगड महापालिकेने सुमारे 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. महामंडळाने सीआरपीएफ बटालियन 113 डीएसपी हरजिंदर सिंग यांच्या नावाने हे चलन जारी केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महापालिकेकडून घराच्या मागे कचरा असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते पहाटे येथे पोहोचले होते.

Chandigarh MC cut Challan Of Dirt Near Chief Minister Residence
मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर साचली घाण.. महापालिकेने ठोठावला दहा हजाराचा दंड..

घरात सुरक्षा कर्मचारी राहतात: मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना घर क्रमांक 7 देण्यात आले आहे. पण, ते घर क्रमांक 6 मध्ये राहतात. जिथे मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा कर्मचारी राहतात. मंत्र्यांची वाहनेही येथे उभी असतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या अधिकाऱ्याने चालान कापले त्याने चालान पेपरवर सही करण्यास नकार दिला. एका आठवड्यात चलन भरता येईल, असे महामंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा : Free Electricity In Panjab: पंजाबमधील प्रत्येक घरी आजपासून दरमहा 300 युनिट मोफत वीज मिळणार -मान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.