ETV Bharat / bharat

CBI Arrested Manish Sisodia : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने केली अटक; वाचा काय आहे 'ते' प्रकरण? - CBI arrests Manish Sisodia

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. सुमारे आठ तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर सीबीआयने त्यांना अटक केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वीच त्यांच्या अटकेची भीती व्यक्त केली होती.

CBI Arrested Manish Sisodia
CBI Arrested Manish Sisodia
author img

By

Published : Feb 26, 2023, 8:04 PM IST

Updated : Feb 26, 2023, 10:59 PM IST

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयने रविवारी सिसोदिया यांची आठ तास चौकशी केली. चौकशीसाठी जाण्यापूर्वी सिसोदिया यांनी अटकेची भीती व्यक्त केली होती. सीबीआय कार्यालयात पोहोचण्यापूर्वी त्यांनी आईचे आशीर्वाद घेतले होते. त्यानंतर ते राघाटावर गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय सिंह, पक्षाचे इतर नेतेही उपस्थित होते. येथून निघाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले होते.

  • Manish is innocent. His arrest is dirty politics. There is a lot of anger among the people due to the arrest of Manish. Everyone is watching...our struggle will get stronger: Delhi CM Arvind Kejriwal on Dy CM Manish Sisodia's arrest pic.twitter.com/LpbByJHZ1P

    — ANI (@ANI) February 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नरेंद्र मोदीं केजरीवाल यांना घाबरतात : आपल्याला 7-8 महिने तुरुंगात राहावे लागू शकते, असे त्याने आपल्या भाषणात म्हटले होते. पण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तुम्ही दिल्लीच्या विकासासाठी काम करत राहाल अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. ते म्हणाले की, आज नरेंद्र मोदींना राहुल गांधींना घाबरत नाहीत, तर अरविंद केजरीवाल यांना घाबरतात. मी आज सीबीआय कार्यालयात जात असून, माझ्यासोबत देशवासीयांचे आशीर्वाद असल्याचे त्यांनी म्हटले होते.

तुमच्या कुटुंबाची पूर्ण काळजी घेईन : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून म्हटले आहे की, देव तुमच्या पाठीशी आहे. लाखो मुलांचे, त्यांच्या पालकांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. देशासाठी आणि समाजासाठी तुरुंगात गेल्यावर तुरुंगात जाणे हा दुर्गुण नसून गौरव आहे. तुम्ही लवकरच तुरुंगातून परत येशाल अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. मुले, पालक आणि आम्ही सर्व दिल्ली तुमची वाट पाहत आहोत. तुम्ही तुमच्या कुटूंबाची काळजी करु नका, तुमच्या संपूर्ण कुटूंबाची काळजी मी घेईल असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण? - १७ नोव्हेंबर 2022 ला दिल्ली सरकारने नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले. यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होईल आणि मद्य माफियांवर अंकुश बसेल, असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे या धोरणाअंतर्गत सर्व सरकारी आणि खासगी दारूची दुकाने बंद करून नवीन निविदा जारी केल्या होत्या. नवीन धोरणानंतर सर्व दुकाने खासगी व्यवसायिकांच्या ताब्यात गेली. यावर दिल्लीच्या उपराज्यपालांनी आक्षेप घेतला होता. हे धोरण राबवताना गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप केला होता.

हेही वाचा - CM Food Bill : अबब! मुख्यमंत्री शिंदेंच्या जेवणाचे बिल 2 कोटी; चहात सोन्याचे पाणी वापरले का?

Last Updated : Feb 26, 2023, 10:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.