ETV Bharat / bharat

Cash For Questions Row: उद्योगपती हिरानंदानी यांचे खासदार महुआ यांच्यावर धक्कादायक आरोप, पंतप्रधानांसह अदानींना लक्ष्य करण्याकरिता...

तृणमुलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बदनामीसाठी गौतम अदानी यांना लक्ष्य cash for questions केलं होतं, असा दावा उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांनी प्रतिज्ञापत्रातून केला होता. त्यामुळे टीमसीच्या खासदार महुआ यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

Cash For Questions Row
Cash For Questions Row
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 20, 2023, 8:51 AM IST

नवी दिल्ली- संसदेत प्रश्न विचारण्याकरिता पैसे विचारण्याच्या ( cash for questions) प्रकरणात खासदार महुआ मोईत्रा यांना मोठा धक्का बसला आहे. रिअल इस्टेट टू एनर्जीचे सीईओ उद्योगपती दर्शन हीरानंदानी हे खासदार महुआ यांच्या प्रकरणात शासकीय साक्षीदार झाले आहेत. अदानी समुहाविरोधात प्रश्न विचारण्याकरिता हिरानंदानी यांनी खासदार मोईत्रा यांना पैसे दिल्याचा आरोप भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला होता. हे आरोप हिरानंदानी यांनी मान्य केले आहेत.

उद्योगपती हिरानंदानी यांनी प्रतिज्ञापत्रात खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरोधात धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं की, पंतप्रधान मोदी यांना बदनाम करण्यासाठी गौतम अदानी यांना लक्ष्य करण्यात येत होतं. कोणताही ठपका नसल्यानं पंतप्रधान मोदींवर निशाणा साधण्याची आजवर विरोधकांना संधी मिळाली नाही. मोईत्रा यांच्याकडून चैनीच्या वस्तुंच्या मागणी करण्यात येत होती. दिल्लीमधील बंगल्याचे नुतनीकरण करण्यासाठी त्यांनी मदत मागितली. तसेच प्रवासाचा खर्चही मागण्यात आला. खासदार मोईत्रा यांच्या देशातील आणि विदेशातील प्रवासाचा खर्च आणि इतर मदतीचा हिरानंदानी यांनी प्रतिज्ञापत्रात उल्लेख केला.

दर्शन हिरानंदानी यांनी प्रतिज्ञापत्रात काय म्हटले आहे?

  • २०१७ मध्ये बंगाल ग्लोबल बिझनेस समिटमध्ये हिरानंदानी यांची मोईत्रा यांच्याबरोबर पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर गेले काही वर्ष मोईत्रा यांच्याबरोबर चांगली मैत्री झाली. त्यामधून विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये व्यवसायाला संधी मिळावी, अशी हिरानंदानी यांना आशा होती.
  • गौतम अदानी व पंतप्रधान मोदी हे एकाच राज्यातील आहेत. त्यामुळे मोईत्रा यांनी अदानी यांना लक्ष्य केल्याचं हिरानंदानी यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं. अदानी यांच्या बदनामीतून उद्योजक, राजकीय व्यक्ती आणि माध्यमांतून समर्थन मिळेल, अशी खासदार मोईत्रा यांची अपेक्षा होती.
  • खासदारांना देण्यात येणार ई-मेल त्यांनी हिरानंदानी यांना दिला होता. त्यामुळे प्रश्न पाठवून मोईत्रा यांना संसदेत प्रश्न विचारण शक्य होतं. त्यांनी दिलेला प्रस्ताव मी स्वीकारला होता, असंही उद्योगपती दर्शन यांनी म्हटलं.
  • अदानी समूहाशी संबंधित प्रश्न विचारल्यानंतर मिळालेल्या प्रतिक्रियांनी त्यांना आनंद झाला. संसद खासदारांना असलेले लॉग इन आणि पासवर्डदेखील दिला होता. त्यामुळे त्यांच्यामार्फत थेट संसदेत प्रश्न विचारणं शक्य होणार होते.

हेही वाचा-

  1. Mahua Moitra : अरुण जेटलींचे पुत्र रोहन जेटलींवर लैंगिक छळाचा आरोप, महुआ मोईत्रा म्हणाल्या, 'भाजप नेते..'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.