ETV Bharat / bharat

अमरिंदर सिंग-अमित शाह यांची दिल्लीत भेट; कॅप्टन म्हणाले, शेतकरी आंदोलनावर झाली चर्चा!

अमरिंदर सिंग यांनी अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. भेटीनंतर अमरिंदर सिंग यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की शेतकरी कायद्यांबाबत भेटीमध्ये चर्चा करण्यात आली आहे.

अमरिंदर सिंग अमित शाह भेट
अमरिंदर सिंग अमित शाह भेट
author img

By

Published : Sep 29, 2021, 9:22 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेसवर नाराज झालेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बुधवारी दिल्लीत भेट घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमरिंदर सिंग हे शाह यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी पोहोचले. या भेटीत शेतकरी आंदोलनावर चर्चा झाल्याचे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा 18 सप्टेंबरला राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग हे काँग्रेसवर नाराज आहेत. नवज्योत सिंग सिद्धू यांच्याविरोधात अमरिंदर सिंग यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अशातच ते दिल्लीमध्ये अमित शाह यांची भेट घेणार असल्याची चर्चा होती. तसेच ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, अमरिंदर सिंग यांचा दिल्ली दौरा हा खासगी असल्याचे त्यांच्या माध्यम सल्लागाराने स्पष्ट केले होते.

संबंधित बातमी वाचा-पंजाबमध्ये राजकीय हालचालींना वेग.. कॅप्टन अमरिंदर सिंग अमित शाह यांच्या भेटीला, भाजप प्रवेशाची शक्यता

शाह यांच्या भेटीनंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे ट्विट

अमरिंदर सिंग यांनी अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. भेटीनंतर अमरिंदर सिंग यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की शेतकरी कायद्यांबाबत भेटीमध्ये चर्चा करण्यात आली आहे. खूप दिवसांपासून लांबलेले शेतकरी आंदोलन समाप्त करण्याच्या दिशेने व शेतकरी कायदे रद्द करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. किमान आधारभूत किंमत हमी आणि पंजाबमधील धान्य उत्पादनांबाबतही चर्चा केल्याचे अमरिंदर सिंग यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

संबंधित बातमी वाचा-नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची 'ही' आहेत 5 कारणे

अमरिंदर सिंग यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुकराल यांनीही ट्विट केले आहे. अमित शाह आणि अमरिंदर सिंग यांच्या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

संबंधित बातमी वाचा-दिल्लीमध्ये अमित शाह यांची कॅप्टन भेट घेणार का ? ट्विट करून अमरिंदर यांनी दिले स्पष्टीकरण

भाजपच्या खासदारांनी ट्विट करत भेटीची मंगळवारीची दिली होती माहिती-

भाजपचे खासदार श्वेत मलिक यांनी मंगळवारी ट्विट करत अमित शाह व अमरिंदर सिंग यांची भेट होणार असल्याचे म्हटले होते. भारतामधील सर्वात जुना पक्ष आपल्या सदस्यांमध्ये एकी ठेवण्यात अपयशी ठरत आहे. मलिक यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावरही टीका केली. सिद्धू हे भाजपात असतानाही हट्ट करत होते. त्यांचा राजीनामा हे केवळ ब्लॅकमेलिंग आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.