चंदीगड : पाकिस्तानकडून ड्रोन ( Pakistani Drone ) पाठवण्याची प्रक्रिया अद्याप थांबलेली नाही. पाकिस्तान आपल्या ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रे आणि कधी कधी हेरॉइनची खेप भारतात अवैधरित्या पाठवत आहे. याच भागात पाकिस्तानच्या तस्करांनी पुन्हा एकदा भारतीय सीमेवर ड्रोन पाठवल्याचे समोर आले आहे.( Pakistani Drone At Tarn Taran On Punjab Border ) बीएसएफने परिसरात शोध मोहीम सुरू केली आणि यामध्ये शोध मोहिमेदरम्यान, बीएसएफने एक सीलबंद पॅकेट जप्त केले ज्यामध्ये हरोहनचे वजन 2 किलो 470 ग्रॅम असल्याचे आढळून आले. सध्या बीएसएफकडून परिसरात शोध मोहीम राबवली जात असून ड्रोनचा शोध घेतला जात आहे. ( BSF Intercepts Pakistani Drone )
-
#WATCH | A quadcopter was recovered from the fields of village Kalia in Punjab in broken condition at about 8:50am today.
— ANI (@ANI) December 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(Source: BSF) pic.twitter.com/83Brn9aNQl
">#WATCH | A quadcopter was recovered from the fields of village Kalia in Punjab in broken condition at about 8:50am today.
— ANI (@ANI) December 6, 2022
(Source: BSF) pic.twitter.com/83Brn9aNQl#WATCH | A quadcopter was recovered from the fields of village Kalia in Punjab in broken condition at about 8:50am today.
— ANI (@ANI) December 6, 2022
(Source: BSF) pic.twitter.com/83Brn9aNQl
5-6 डिसेंबरच्या रात्री, बीएसएफ पंजाब फ्रंटियरच्या जवानांनी तरनतारन जिल्ह्यात एक पाकिस्तानी ड्रोन अडवला. यावेळी जवानांनी केलेल्या शोधमोहिमेत हेरॉईनची खेपही जप्त करण्यात आली. बीएसएफ पंजाब फ्रंटियरने माहिती दिली की प्राथमिक शोधादरम्यान, बीएसएफने तरनतारनमधील कालिया गावाजवळ भारतीय हद्दीतून संशयित हेरॉईनचे 1 पॅकेट (अंदाजे 2.470 किलो) जप्त केले आहे.
बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील तरनतारनमधील कालिया या सीमावर्ती गावात हे ड्रोन सापडले आहे. रात्रीच्या सुमारास बीएसएफ जवानांना ड्रोनचा आवाज आला. जवानांनी तातडीने ड्रोनवर गोळीबार सुरू केला मात्र ड्रोन पळून जाण्यात यशस्वी झाला.