ETV Bharat / bharat

Bride Refused To Marry Dark Groom : 'नवरा सावळा आहे', वधूने लग्न मंडपातच दिला लग्नाला नकार - वधूचा सावळ्या वराशी लग्न करण्यास नकार

बिहारमधील भागलपूरमध्ये लग्नाच्या वेळी वयस्कर व सावळ्या वराला पाहून वधू संतापली. वधूने वराशी लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिला. वधूच्या कुटुंबाने तिला मनवण्याचे बरेच प्रयत्न केले मात्र तिने कोणाचेच ऐकले नाही.

Bride Refused To Marry Dark Groom
वधूने सावळ्या वराशी लग्न करण्यास नकार दिला
author img

By

Published : May 17, 2023, 4:06 PM IST

भागलपूर (बिहार) : लग्न हा कोणाच्याही आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असतो. म्हणूनच म्हणतात की लग्नाचा निर्णय खूप काळजीपूर्वक घेतला पाहिजे. लग्न हे सात जन्मांचे अतूट बंधन मानले जाते. त्याचबरोबर अशा अनेक मुली आहेत ज्यांच्यासाठी लग्न म्हणजे आयुष्यभराची शिक्षा ठरते. अनेक वेळा असे दिसून येते की, गरिबीमुळे आई - वडील हुंडा देऊ शकत नसल्यामुळे आपल्या मुलीला कोणाच्याही स्वाधीन करून त्यांच्यावरचे ओझे उतरवायला पाहतात. पण कधी कधी मुली योग्य वेळी आवाजही उठवतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वराला स्टेजवर पाहून वधूला राग आला आणि तिने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला.

वधूने लग्नास नकार दिला : प्रकरण भागलपूर जिल्ह्यातील कहालगावच्या रसालपूर गावातील आहे. विनोद मंडल यांची मुलगी किट्टू कुमारी हिचा विवाह धनौरा येथील रहिवासी डॉ. वीरेंद्र सिंह यांचा मुलगा नीलेश कुमार सिंग याच्याशी होणार होता. हे आनंदाचे क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यात वधू पक्ष आणि वधू पक्षाचे लोक मग्न होते. दरम्यान, मंचावर वधू किट्टू कुमारीने वराच्या गळ्यात हार घालण्यास आणि टिळक लावण्यास स्पष्ट नकार दिला. तिला मनवण्याचे प्रयत्न चालू राहिले पण वधू राजी झाली नाही. यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी मुलीच्या कुटुंबीयांना बरेच काही सुनावले, परंतु तरीही वधू आपल्या निर्णयावर ठाम राहिली. त्यानंतर वर पक्षाला वधूशिवाय परतावे लागले.

वराचे अधिक वय आणि सावळ्या रंगामुळे नकार : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की वधूने तिच्या भावी पतीला स्टेजवर पाहताच तिचा चेहरा फिका पडतो. रागावलेली वधू लग्नाला स्पष्टपणे नकार देते. त्यानंतर सर्वजण मुलीला लग्न न करण्याचे कारण विचारतात. मुलीने यामागचे कारण सांगितले की, वराचे वय अधिक असून तो सावळ्या रंगाचा आहे.

मुलीने कोणाचेच ऐकले नाही : त्यानंतर आई - वडिलांसह सर्व नातेवाईकांनी वधूला वराला हार घालण्यास सांगितले. सर्वांनी वधूला विनवणी केली, नंतर तिला खूप फटकारले, परंतु वधू आपल्या निर्णयापासून डगमगली नाही. तिने लग्नास नकार दिला आणि मंचावरून खाली उतरून ती तिच्या खोलीत गेली. या दरम्यान मुलाच्या वडिलांनीही मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र मुलगी लग्नास मान्य झाली नाही.

मुलीने लग्नास नकार का दिला याचे कारण आम्हाला माहित नाही. तिने असे का केले हे प्रत्येकजण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. - डॉ वीरेंद्र सिंग, वराचे वडील

हेही वाचा :

  1. Tamil Nadu Hooch Tragedy : विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा झाला 21, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची सरकारला नोटीस
  2. Bengal Firecracker Factory Blast : पश्चिम बंगालमध्ये विना परवाना फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 9 जण ठार
  3. Junmoni Rabha Death : लेडी सिंघम जुनमोनी राभा यांच्या अपघाती मृत्यूबाबत संशय, आसामची सीआयडी करणार चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.