ETV Bharat / bharat

Draupadi Murmu: भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील भाजपने नामनिर्देशित केलेल्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज शुक्रवारी (दि. 24 जुन)रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते.

भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू

author img

By

Published : Jun 24, 2022, 9:48 AM IST

Updated : Jun 24, 2022, 1:14 PM IST

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील भाजपने नामनिर्देशित केलेल्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज शुक्रवारी (दि. 24 जुन)रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते.

  • Delhi | NDA's Presidential candidate Droupadi Murmu files her nomination in the presence of PM Modi, Union cabinet ministers & CMs of BJP & NDA ruled states, at Parliament building

    (Source: DD) pic.twitter.com/Ko1kxl3meJ

    — ANI (@ANI) June 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भाजपने आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या सर्व मित्रपक्षांना नामांकन समारंभात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, नॅशनल पीपल्स पार्टी (NCP) प्रमुख आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी शुक्रवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी नामांकनात आपला सहभाग निश्चित केला आहे. नामांकनावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे देखील उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.

बुधवारी संध्याकाळी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ओडिशाच्या सर्व आमदारांना मुर्मू यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दल (BJD) हा एनडीएचा सहयोगी नाही. परंतु, अनेकदा महत्त्वाच्या विधेयकांवर आणि विधानसभेवर (NDA) सरकारला पाठिंबा देताना दिसतो. 18 जुलै रोजी होणार्‍या आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी उघडपणे मुर्मू यांच्या उमेदवारीला दुजोरा दिला आहे.

सोमवारी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना जेपी नड्डा यांनी आगामी राष्ट्रपती निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांची एनडीएची उमेदवार म्हणून घोषणा केली. मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्यापूर्वी भाजप संसदीय मंडळ आणि एनडीएच्या सर्व मित्रपक्षांनी २० हून अधिक नावांवर चर्चा केली होती, असेही नड्डा यावेळी म्हणाले आहेत.

द्रौपदी मुर्मू या भारताच्या पुढील राष्ट्रपती झाल्या तर भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती असतील आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती असतील. ओडिशाच्या माजी मंत्री द्रौपदी मुर्मू या प्रमुख राजकीय पक्ष किंवा आघाडीच्या ओडिशातील पहिल्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार आहेत. त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. (2015 ते 2021)पर्यंत त्यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हणून काम पाहिले.

हेही वाचा - PM Modi Hyderabad Visit : पंतप्रधान मोदी हैदराबादच्या दौऱ्यावर.. शहरात पोलिसांसह 'स्नायपर्स'ची तैनाती

Last Updated : Jun 24, 2022, 1:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.