ETV Bharat / bharat

मी जीव द्यायला जातेय... म्हणत भाजपा खासदाराच्या सुनेचा आत्महत्येचा प्रयत्न

भाजपा खासदार कौशल किशोर यांच्या सुनेने आत्महत्येचा प्रयत्न केला. एक व्हिडिओ जारी करत अंकिता यांनी हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

उत्तर प्रदेश क्राईम न्यूज
उत्तर प्रदेश क्राईम न्यूज
author img

By

Published : Mar 15, 2021, 10:44 AM IST

Updated : Mar 15, 2021, 1:40 PM IST

लखनौ - भाजपा खासदार कौशल किशोर यांच्या सुनेने आत्महत्येचा प्रयत्न केला. एक व्हिडिओ जारी करत अंकिता यांनी हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अंकिता यांना रुग्णालयात दाखल केलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आत्महत्येपूर्वी अंकिता यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी पतीने आपल्या धोका दिल्याचे म्हटलं. "मी जीव द्यायला जातेय", यासाठी तुम्ही (पती) आणि तुमच्या घरचे जबाबदार आहात, असे अंकिता यांनी म्हटलं आहे.

भाजपा खासदाराच्या सुनेचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रत्येक क्षणाला तुमच्या (पती आयुष) सोबत होते. मात्र, तुम्ही माझ्याकडून सगळं हिसकावून घेतलं. तुम्ही तुमच्या घरी गेलात. मात्र, माझा विचार केला नाही.घरात सिलेंडर नाही. माझ्याकडे पैसै आहेत की नाहीत, मी काही खाल्ले की नाही, घराचे भाडे या सर्व गोष्टीचा तुम्ही विचार केला नाही. आता मी तुमच्यापासून खूप दूर जात आहे. आतापर्यंत तुमच्यासोबत होते. ही माझी चूक होती, असे अंकिता यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं.

भाजपा खासदाराच्या सुनेचा आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ

काय आहे प्रकरण ?

गेल्या वर्षी भाजपा खासदार कौशल किशोर यांचा मुलगा आयुषने अंकिताशी प्रेमविवाह केला होता. या लग्नामुळे आयुष यांचे कुटुंब आनंदी नव्हते. त्यामुळे आयुष आंकितासोबत मंडियावमधील एका ठिकाणी भाड्याच्या घरात राहत होते. काही दिवसांपूर्वी अज्ञांतानी आपल्यावर गोळीबार केल्याचा आरोप आयुष यांनी केला होता. याप्रकरणी त्यांचा मेव्हणा आदर्श यांना अटक करण्यात आले होते. मात्र, आयुषने स्वत:च आपल्यावर गोळीबार करवून घेतल्याचे आदर्शने सांगितले. या गोळीबाराच्या प्रकरणात पाच - सहा जणांना अडकवण्यासाठी हा कट रचण्यात आला होता. यानंतर आयुष आणि अंकितामध्ये तणाव निर्माण झाला होता. दोघांनी व्हिडिओ जारी करत एकमेंकावर आरोप केले होते.

हेही वाचा - जागतिक दर्जाचे चित्रकार लक्ष्मण पै यांचे निधन

Last Updated : Mar 15, 2021, 1:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.