ETV Bharat / bharat

Agnipath: भाजप नेत्याची अग्निपथ'मधील जवानांबद्दल जीभ घसरली! म्हणाले, पक्ष कार्यालयाच्या सुरक्षेसाठी मिळेल प्राधान्य - कैलाश विजयवर्गीय यांचे अग्निवीर यांच्याबद्दल वक्तव्य

भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना रविवारी भापपच्या कार्यालयात सुरक्षा ठेवायची असेल तर पहिली पसंती अग्निपथ योजनेत भरती झालेल्या जवानांना दिली पाहिजे असे वक्तव्य केल्याने मोठा गदारोळ सुरू झाला आहे. विजयवर्गीय त्यांच्या विरोधात देशभरात संतापाची लाट आहे.

भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय

author img

By

Published : Jun 19, 2022, 9:18 PM IST

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना रविवारी भापपच्या कार्यालयात सुरक्षा ठेवायची असेल तर पहिली पसंती अग्निपथ योजनेत भरती झालेल्या जवानांना दिली पाहिजे असे वक्तव्य केल्याने मोठा गदारोळ सुरू झाला आहे. त्यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर विजयवर्गीय यांनी आरोप केला की 'टूलकिट' गँगशी संबंधित लोक आपल्या विधानाचा विपर्यास करून 'कर्मवीरांचा' अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत असही ते म्हणाले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय

विजयवर्गीय यांनी इंदूर येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले की, सैन्याच्या प्रशिक्षणात शिस्त आणि आज्ञाधारकता या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी असून अग्निपथ योजनेंतर्गत सेवेदरम्यान युवकांमध्ये हे दोन्ही गुण विकसित होतील. ते म्हणाले की, जेव्हा एखादा युवक अग्निपथ योजनेंतर्गत सैन्यात प्रशिक्षण घेतो आणि चार वर्षे सेवा करून निघून जातो, तेव्हा त्याच्या हातात 11 लाख रुपये असतील आणि तो अग्निवीरचा टॅग छातीवर लावून फिरेल. तसेच, पुढे म्हणाले भाजपच्या या कार्यालयात मला सुरक्षा ठेवायची असेल, तर मी अग्निवीरांना प्राधान्य देईन अस ते म्हणाले आहेत. याच वक्तव्यावरून देशभर गोंधळ निर्माण झाला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भाजप खासदार वरुण गांधी यांच्यासह अनेक राजकीय व्यक्तींनी विजयवर्गीय यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. त्यांच्या विधानावर गोंधळ निर्माण झाल्यानंतर विजयवर्गीय यांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिले की, 'अग्निपथ योजनेतून बाहेर पडलेला अग्निवीर निश्चितपणे प्रशिक्षित आणि कर्तव्यासाठी वचनबद्ध असेल. सैन्यदलातील सेवा पूर्ण केल्यानंतर ते ज्या ज्या क्षेत्रात जातील त्यामध्ये त्यांच्या कर्तृत्वाचा उपयोग होईल. मला हेच म्हणायचे होते अशी सारवासारव त्यांनी केली आहे.

हेही वाचा - Justice S. S Shinde: महाराष्ट्राचे पुत्र S.S शिंदे यांची राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.