हैदराबाद : बॉलिवूडच्या दोन सुंदर अभिनेत्री आलिया भट्ट (ALIA BHATT) आणि बिपाशा बसू (BIPASHA BASU) सध्या प्रेग्नेंसीमध्ये आहेत. या दोन्ही अभिनेत्री लवकरच त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी देणार आहेत. दोन्ही अभिनेत्रींच्या बेबी शॉवरचा कार्यक्रमही पार पडला असून; आता चाहते फक्त त्यांच्या पहिल्या मुलाची वाट पाहत आहेत. (SENDING COMFY MATERNITY WEAR) (THANKS MOM TO BE ALIA BHATT)
मात्र याआधी बिपाशा बसूने आलिया भट्टचे आभार मानले आहेत. खरंतर आलिया भट्टने बिपाशाला एक सुंदर गिफ्ट पाठवले आहे, त्या बदल्यात बिपाशाने आलियाचे आभार मानले आहेत. बिपाशा बसूने तिच्या इन्स्टास्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बिपाशाने पीच रंगाचा आरामदायी मॅटर्निटी स्वेटशर्ट घातला आहे आणि फोटोंच्या कॅप्शनमध्ये बिपाशाने हे स्वेटशर्ट पाठवल्याबद्दल आलियाचे आभार मानले आहेत.
दोन्ही अभिनेत्री लवकरच आई होणार आहेत. 28 नोव्हेंबरला तिची मोठी बहीण शाहीन भट्टच्या वाढदिवसाच्या आसपास आलिया भट तिच्या पहिल्या मुलाला जन्म देऊ शकते, असे बोलले जात आहे.BIPASHA BASU