नवी दिल्ली - मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप कोणताही कॉल आला नाही. संसदेचे पावसाळी अधिवेशन जवळ आले असून, त्यासाठी मी दिल्लीला आलो असल्याची प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप कोणताही कॉल आला नाही - नारायण राणे - आठवले आरक्षण आंदोलन
![मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप कोणताही कॉल आला नाही - नारायण राणे BIG Breaking News](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12367579-thumbnail-3x2-bigb.gif?imwidth=3840)
19:53 July 06
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप कोणताही कॉल आला नाही - नारायण राणे
19:00 July 06
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आरपीआयची आझाद मैदानात निदर्शने
मुंबई - दलितांवरील अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, ओबीसींचे राजकीय आरक्षण, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आदी मागण्यांसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थित आझाद मैदानात निदर्शने करण्यात आली.
18:38 July 06
संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे दोघांच्या कोठडीत वाढ
मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहाय्यक कुंदन शिंदे यांच्या ईडी कोठडीत वाढ झाली आहे. दोन्ही आरोपींच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी 20 जुलैपर्यंत ईडी कोठडीत असणार आहेत.
17:24 July 06
कुर्ला पश्चिम स्टेशनजवळील चाळ आणि बेकरीला आग
मुंबई - मुंबईतील कुर्ला पश्चिम स्टेशनजवळील एका चाळ आणि बेकरीला आग लागल्याची घटना घडली आहे. लेव्हल 1 ची ही आग आहे. दुपारी 2.30 च्या सुमारास ही आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे. यात कोणीही जखमी नसल्याची माहिती मिळत आहे.
16:21 July 06
कोरोनामुक्त गावात शाळा तूर्तास सुरू होणार नाही; शासन निर्णय घेतला मागे
मुंबई - महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कोरोनामुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत निर्णय सोमवारी घेण्यात आला होता. मात्र, अवघ्या काही तासात जाहीर केलेल्या शासन निर्णयात तांत्रिक त्रुटी असल्याचे कारण देत वेबसाईटवरून हटवण्यांत आला आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत आहे.
16:08 July 06
सिल्लोड तालुक्यात दोन युवकांची आत्महत्या
सिल्लोड तालुक्यात दोन युवकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तालुक्यातील पिंप्री गावं परिसरातील गोडाऊनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघेही वॉचमन म्हणून काम करत होते. ग्रामीण पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
15:32 July 06
स्टेन स्वामींच्या मृत्यूची चौकशी करा; शिक्षक आमदार कपिल पाटील यांची मागणी
मुंबई - स्टेन स्वामी यांचा मृत्यू झाला. आदिवासी लोकांसाठी आयुष्य खर्ची घातलेल्या तामिळनाडूतील या माणसाला भीमा कोरेगावच्या घटनेत दोषी ठरवले. त्यानंतर त्यांना पोलीस कोठडी झाली. परंतु, हॉस्पिटलमध्ये उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला. सरकारी यंत्रणा याला कारणीभूत आहे. छगन भुजबळ यांच्याबाबतही असाच प्रकार सुरू होता. आज ते मंत्री आहेत, वेळीच उपचार मिळाले नसते तर परिस्थिती वेगळी असती, केंद्रीय तपास यंत्रणा काम करत आहे. मात्र राज्य सरकारची जबाबदारी इथे संपत नाही. उपचारात दिरगाई का झाली? राज्य सरकारने हस्तक्षेप का केला नाही? याचा खुलासा करावा, अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.
11:17 July 06
असा बेशिस्तपणा सहन केला जाऊ शकत नाही - संजय राऊत
मुंबई - असा बेशिस्तपणा सहन केला जाऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी आमदारांच्या निलंबनाप्रकरणी दिली आहे. पावसाळी अधिवेशाच्या पहिल्या दिवशी सभागृहात गोंधळ घालून तालिका अध्यक्षांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांना महाराष्ट्र विधानसभेमधून निलंबित करण्यात आले आहे.
11:15 July 06
१२ आमदारांचे निलंबन केल्याप्रकरणी भाजपा आमदारांची विधानसभेबाहेर निदर्शने
मुंबई - आज पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. महाराष्ट्रातील १२ आमदारांचे निलंबन आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ाविरोधात भाजपच्या आमदारांनी मुंबईत राज्य विधानसभेबाहेर निदर्शने केली.
09:33 July 06
ठाणे : प्रभात टॉकीज गल्लीमधील इलेक्ट्रॉनिक्स मार्केटला आग
ठाणे : रेल्वे स्टेशन मार्गावर असणाऱ्या प्रभात टॉकीज गल्लीमधील चार ते पाच दुकानांना आग लागल्याची माहिती समोर आली आहे. याठिकाणी एक फायर इंजिन आणि एक वॉटर टँकर दाखल झाले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे, या गल्लीमध्ये इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने आहेत.
08:29 July 06
नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात दुर्मिळ काळ्या बिबट्याचे दर्शन!
नागपूर : नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील नवेगाव क्षेत्रात दुर्मिळ असा काळा बिबट्या आढळून आला आहे. भारतीय वन्यजीव संस्थेचे वैज्ञानिक डॉ. बिलाल हबीब यांनी ‘ट्विटर’वर अपलोड केलेल्या एका फोटोमध्ये हा बिबट्या दिसून येत आहे. या बिबट्यासोबतच एक सामान्य बिबट्याही या फोटोत दिसून येतो आहे.
यापूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्पात काळा बिबट्या पर्यटकांना दिसून आला होता. त्याचं छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर ताडोबाकडे जाणारे पर्यटक पेंच प्रकल्पाकडे जाऊ लागले होते.
07:07 July 06
गणेशोत्सवादरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी ७२ विशेष गाड्या; मध्य रेल्वेची माहिती
गणपती उत्सवादरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने ७२ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते पनवेल, आणि सावंतवाडी रोड ते रत्नागिरी या मार्गांवर या गाड्या धावतील. मध्य रेल्वेने याबाबत माहिती दिली.
06:50 July 06
आरक्षण आणि दलितांच्या प्रश्नांसाठी रामदास आठवले पुढे; आझाद मैदानामध्ये करणार आंदोलन
मुंबई : केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आज मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन करणार आहेत. ५ टक्के मुस्लिम आरक्षण, मराठा-ओबीसी आरक्षण आणि राज्यातील दलितविरोधी घटनांचं वाढतं प्रमाण यांसह इतर कारणांसाठी ते आंदोलन करणार आहेत.
06:06 July 06
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोन ट्रकना आग; एका चालकाचा मृत्यू
गांधीनगर : गुजरातच्या वलसाडमध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावर काल रात्री दोन ट्रकना आग लागली. राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८वर हा अपघात घडला. यामध्ये एका चालकाचा मृत्यू झाला असून, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.