- शिर्डी जवळील कोर्हाळे येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा तपास लावण्यात पोलीसांना यश
- शनिवारी पती आणी पत्नीची डोक्यात पावडे मारून करण्यात आली होती हत्या
- तीन आरोपींना पोलीसांनी केली अटक
- इतर आरोपी अद्यापही फरार
MAHARASHTRA BREAKING LIVE: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक; पवार वर्षा बंगल्यावर दाखल - anil deshmukh
19:27 June 29
17:54 June 29
तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका टळलेला नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे
- तिसऱ्या लाटेआधी 70 टक्के लसीकरण झाले पाहिजे
- लसीकरणामध्ये हलगर्जीपणा करून चालणार नाही
- डेल्टा प्लसचे अद्याप केवळ 21 रुग्ण राज्यात सापडले
- त्यातले 20 रुग्ण बरे झाले तर एका रुग्णांचा मृत्यू
- डेल्टा प्लसमुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही
17:28 June 29
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक होेणार असून शरद पवार वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. दरम्यान, काही वेळापूर्वी गृहमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची देखील बैठक होणार आहे.
15:52 June 29
- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस आयुक्त हेमंत नगराळे वर्षा निवस्थानी दाखल
- अनिल देशमुख यांच्यावर होत असलेल्या कारवाई संदर्भात बैठक
15:52 June 29
- मालाड इमारत दुर्घटनेबाबत चौकशी समितीचा अहवाल उच्च न्यायालयात सादर
- अहवालात पालिका आयुक्तांसह अन्य स्थानिक पालिका अधिकाऱ्यांना दुर्घटनेसाठी जबाबदार धरण्यात आल्याची माहिती
- संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कायद्याने काय कारवाई करता येईल, हे पुढील सुनावणीत स्पष्ट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश
15:13 June 29
- मुंबईत झालेल्या बोगस लसीकरणासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका
- कांदिवली प्रकरणात सुरू असलेल्या कारवाईचा अहवाल राज्य सरकारककडून न्यायालयापुढे सादर
- बोगस लसीकरणाला बळी पडलेल्या दोन हजार जणांच्या लसीकरणाचे काय?, उच्च न्यायालयाचा सवाल
- या सर्वांची अँटीबॉडी टेस्ट करून पालिका त्यांचे नियमित लसीकरण करेल; मुंबई महानगरपालीकेची न्यायालयात माहिती
15:13 June 29
फडणवीसांची संन्यास घेण्याची भाषा दुर्दैवी - संजय राऊत
मुंबई - फडणवीसांची संन्यास घेण्याची भाषा दुर्दैवी असल्याचे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. तसेच पक्ष म्हणून महाविकास आघाडीत मतभेत असू शकतात, पण सरकारमध्ये कोणतीही नाराजी नाही, असेही राऊत म्हणाले.
13:09 June 29
- फेडरल रिटेलर असोसिएशन आणि पान-बिडी-तंबाखू विक्रेता संघाचा मुंबई उच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज
- कोरोना आणि धुम्रपान यांचा संबंध लावून राज्य सरकारने तंबाखुजन्य पदार्थांवर न घालण्याची मागणी
- हस्तक्षेपाला न्यायालयाची मंजूरी, सविस्तर युक्तीवाद सादर करण्याचे निर्देश
- जाणकारांच्या समितीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयापुढे सादर
- जर या दाव्यात तथ्य असेल, तर केंद्र सरकारने सिगरेटच्या पाकिटांवरून वैधानित इशारा काढायला आता हरकत नाही - मुंबई उच्च न्यायालय
13:07 June 29
मुंबईत झालेल्या बोगस लसीकरणासंदर्भात हायकोर्टात याचिका
मुंबई - शहरात झालेल्या बोगस लसीकरणासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. कांदिवली प्रकरणात सुरू असलेल्या कारवाईचा अहवाल राज्य सरकारकडने कोर्टापुढे सादर केला आहे. त्यानंतर या बोगस लसीकरणाला बळी पडलेल्या दोन हजार जणांच्या लसीकरणाचं काय? असा सवाल हायकोर्टाने विचारला. तर, याचे उत्तर देताना मुंबई महापालिकेने म्हटलं की, या सर्वांची अँटीबॉडी टेस्ट करून पालिका गरज भासल्यास नियमित लसीनुसार त्यांचे पुन्हा लसीकरण होईल. लस घेतल्याची नोंदणी झालेली असल्याने केंद्र सरकारच्या पोर्टलवर त्यांची पुन्हा लसीकरण नोंदणी होणार नाही.
13:05 June 29
बेळगावमध्ये एकाच कुटुंबातील चार जण पाण्यात बुडाले
बेळगाव - बेळगाव जिल्ह्यातल्या अथणी तालुक्यातील हळ्याल गावात एकाच कुटुंबातील चार जण बुडाल्याची माहिती मिळत आहे. हे सर्वजण अंथरून धुण्यासाठी गेले असताना पाण्यात बुडाले. परशुराम गोपाल बनसुडे (वय 36), सदाशिवा बनसुडे (वय 24), शंकरा बनसुडे (वय 20), दरेप्पा बनसुडे (वय 22) अशी पाण्यात बुडालेल्या बांधवांची नावे आहेत. या सर्वांचा शोध सुरू आहे.
11:42 June 29
अनिल देशमुखांचे ईडीला पत्र, जबाब नोंदवण्यासाठी 'व्हीसी'चा दिला पर्याय
मुंबई - ईडीने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना समन्स बजावले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आज देखमुखांची चौकशी केली जाणार होती. मात्र, देशमुखांनी पुन्हा एकदा ईडीला पत्र पाठवले आहे. पत्रात लिहिलंय की, ईडीला चौकशी करायची असेल तर ती ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून करावी. चौकशीसाठी कुठल्याही वेळी आपण तयार असल्याचे त्यांनी ईडीला कळवले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना अनिल देशमुख यांचे पत्र मिळाले आहे. परंतु त्यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही.
10:26 June 29
नाशिकमधील आदिवासी विकास विभागातील आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
नाशिक - आदिवासी विकास विभागातील रोजदारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन केल्याने काही जणांना ताब्यात घेण्यात आले. वर्ग 3 आणि 4 च्या कर्मचाऱ्यांनी बिर्हाड मोर्चा काढून मंत्रालयात आत्मदहनाचा इशारा दिला होता. मुंढे गाव जवळील स्मशानभूमीत आंदोलकांनी रात्री आश्रय घेतला होता. तिथूनच रात्री उशिरा आंदोलकांना ताब्यात घेतले.
08:50 June 29
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचे समन्स
ईडीने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना समन्स बजावले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आज देखमुखांची चौकशी केली जाणार आहे.
06:03 June 29
श्रीनगरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांत चकमक झाली. श्रीनगरच्या मल्हूरा परीमपोरा भागात झालेल्या या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या दोघांपैकी एक दहशतवादी हा पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर होता. अबरार असं या कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे.