भोपाळ - मध्यप्रदेश एटीएसने जुन्या शहरातून सुमारे सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. एमपी एटीएसने एक दिवसांपूर्वी सहारनपूर येथील देवबंदच्या खानकाह रोड येथील एका वसतीगृहातून तिघांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन एटीएसने सहा जणांना ताब्यात घेण्यात ( Terrorist Caught in Bhopal ) आले. संशयित भोपाळच्या ऐशबाग, निशातपुरा या भागात भाड्याच्या घरात राहत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे बारा लॅपटॉप व काही धार्मिक पुस्तके एटीएस पथकातील पोलिसांनी जप्त केली आहेत.
गोळी मारुन तोडला दरवाजा - रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सुमारे 50 बंदुकधारी पोलिसांनी ऐशबाग परिसरातील एका घराचे दार गोळी मारुन तोडले. त्यानंतर घरात राहणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यानंतर निशातपुरा भागातील एका घरातून चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून लॅपटॉप व काही धार्मिक पुस्तके जप्त केली आहेत.
नोकरीच्या शोधात असल्याचे दिले कारण - ऐशबाग परिसरात राहणाऱ्यांच्या घरमालकाने सांगितले की, एक जण कॉम्प्युटर दुरुस्त करण्याचे काम करतो. त्याच्या सांगण्यावरुन दोघांना राहण्यासाठी घर दिल्याचे घरमालकाने सांगितले. नोकरी शोधत असल्याचे कारण त्यांनी दिले. घरमालकाने त्या दोघांकडे सतत आधार कार्डची मागणी केली. पण, ते सतत टाळत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी पुन्हा आधार कार्डची मागणी ( Terrorisms in MP ) केली. पण, त्या तरुणांनी घर सोडणार असल्याचे सांगितले. त्यामुळे नंतर आधार कार्डची मागणी केली नसल्याचे घरमालकाने सांगितले. दरम्यान, रात्री खूप आवाज येत असल्याने घरमालक बाहेर येऊन पाहिल्यास पोलिसांना मोठा फौजफाटा त्यांना दिसला. याबाबत भोपाळ पोलिसांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचा - Recruitment Of Transgender In Police : आता तृतीयपंथी बनणार पोलीस; 'या' राज्याचा मोठा निर्णय