ETV Bharat / bharat

Akanksha Dubey suicide case: समर सिंह परदेशात जाऊ शकणार नाही, लुकआउट नोटीस जारी - भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे समर सिंह

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या मृत्यूप्रकरणी पोलीस आता भोजपुरी गायक समर सिंहवर कारवाई करत आहेत. त्याला परदेशात पळून जाण्यापासून रोखण्यासाठी लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे.

Bhojpuri actress Akanksha Dubey
भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे
author img

By

Published : Apr 6, 2023, 7:33 PM IST

माहिती देताना पोलीस अधिकारी

वाराणसी (उत्तर प्रदेश) : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे मृत्यू प्रकरणी आता भोजपुरी गायक समर सिंह याच्यावर कडक कारवाई केली जात आहे. गेल्या 11 दिवसांपासून समर सिंहला अटक न झाल्यानंतर आता पोलीस समर सिंहचा पलायनाचा मार्ग बंद करत आहेत. समर सिंगचा पासपोर्ट जप्त करण्याची कारवाई करण्यासोबतच पोलिसांनी त्याच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. म्हणजे आता समर सिंह परदेशात जाऊ शकत नाहीत. दरम्यान, देशातील सर्व विमानतळांवर ही सूचना प्रसारित केली जात आहे.

त्यानंतर पोलिसांनी ही आत्महत्या मानली : 25 मार्च रोजी भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिचा मृतदेह वाराणसीच्या सारनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील एका हॉटेलमध्ये एका खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. हॉटेलमधील लोकांनी या खोलीचे दार तोडून संबंधीत घटनेची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी ही आत्महत्या मानली. पण, दोन दिवसांनंतर या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला. आकांक्षा दुबेची आई मधू दुबे यांनी भोजपुरी गायक समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंह यांना आत्महत्येस प्रवृत्त असल्याचा आरोप केला आणि त्यांच्या मुलीच्या हत्येचा आरोपही केला.

बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद : या प्रकरणी समर सिंह विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. यासंदर्भात अतिरिक्त पोलीस आयुक्त संतोष सिंह सांगतात की, लुकआउट नोटीस जारी करण्याची कारवाई करण्यात आली आहे. लवकरच समर सिंगवर बक्षीस जाहीर करण्याची कारवाई केली जाईल. सध्या तो भारत सोडून कुठेही जाऊ शकत नाही. त्याचे बाहेर पडण्याचे मार्ग सर्व विमानतळांवर बंद करण्यात आले आहेत.

सीबीआय चौकशीचीही मागणी : आकांक्षा दुबे हिच्या मोबाईलवरूनही माहिती काढली जात असून, एक-दोन दिवसांत ती पोलिसांपर्यंत पोहोचेल. सर्व पुरावे गोळा केल्यानंतर समर सिंगच्या अटक प्रकरणाला वेग येईल अशी परिस्थिती आहे. त्याचवेळी, आकांक्षा दुबेचे वकील शशांक शेखर त्रिपाठी यांनीही लुकआउट नोटीस जारी झाल्याची पुष्टी केली आहे. आम्ही सीबीआय चौकशीचीही मागणी केली असल्याचे ते म्हणतात. याप्रकरणी समर सिंह यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचाही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Karnataka Assembly Elections: कर्नाटक काँग्रेसकडून 42 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.