ETV Bharat / bharat

रोजगारासाठी तरुणांकडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न

सरकारीने शासकीय नोकर भरती सुरू करावी, या मागणीसाठी तरुणांनी मुख्यमंत्री निवासाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला.

spot photo
आंदोलनकर्ते
author img

By

Published : Nov 1, 2020, 9:10 PM IST

करनाल (हरियाणा) - योग्यतेनुसार रोजगार द्या, या मागणीसाठी 23 ऑक्टोबरला उचाना कला येथून काही तरुणांनी पायी रॅली काढली होती. ती रॅली आज (1 नोव्हेंबर) करनाल येथे पोहोचली आहे. यावेळी एसएफआई आणि डीएफआईच्या बॅनर खाली स्वतंत्र निदर्शने केली.

दरम्यान, तरुणांनी मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्या घारबाहेर घेराव घालण्याचा प्रयत्न केला. पण, स्थानिक पोलिसांनी मुख्यमंत्री आवासाच्या मार्गावर बॅरिकेडींग लावत तरुणांचा मोर्चा अडवला. यावेळी तरुण व पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला.

आंदोलनावेळचे दृश्य

देशात आजच्या घडीला बेरोजगारी वाढत आहे. सरकारने याबाबत विचार करत योग्य ते पाऊले उचलायला हवीत. योग्यतेनुसार सरकारी नोकर भरती सुरू करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्ता शाहनवाज यांनी केली आहे.

हेही वाचा - गुर्जर आरक्षण आंदोलन : जयपूरमध्ये इंटरनेट सेवेवर आणखी २४ तासांनी वाढवले निर्बंध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.