ETV Bharat / bharat

'तुम्ही तर घराणेशाहीचा नमुना'; नाव न घेता कंगनाचा महाराष्ट्र सरकारवर पुन्हा निशाणा

मुंबई महानगर पालिकेने पाली हिल भागातील कंगना रणौतच्या मनिकर्णिकावर कारवाई करत अवैध बांधकाम पाडले. त्यावरून कंगना ट्विटरवर आक्रमक झाली असून महाराष्ट्र सरकार विरोधी ट्विट करत आहे. मात्र, तिने नुकतेच केलेल्या ट्विटमध्ये कोणाचेही नाव न घेता अप्रत्यक्षपणे हल्ला केला आहे.

Kangana
कंगना रणौत
author img

By

Published : Sep 10, 2020, 5:10 PM IST

मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा ट्विटरद्वारे महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात घराणेशाहीचं राज्य असल्याचं तिने म्हटलं आहे. मुंबई महानगर पालिकेने काल(बुधवार) पाली हिल भागातील कंगना रणौतच्या मनिकर्णिका बंगल्यावर कारवाई करत अवैध बांधकाम पाडले. त्यावरून कंगना ट्विटरवर आक्रमक झाली असून महाराष्ट्र सरकार विरोधी ट्विट करत आहे. मात्र, तिने नुकतेच केलेल्या ट्विटमध्ये कोणाचेही नाव न घेता अप्रत्यक्षपणे हल्ला केला आहे.

  • तुम्हारे पिताजी के अच्छे कर्म तुम्हें दौलत तो दे सकते हैं मगर सम्मान तुम्हें खुद कमाना पड़ता है, मेरा मुँह बंद करोगे मगर मेरी आवाज़ मेरे बाद सौ फिर लाखों में गूंजेगी, कितने मुँह बंद करोगे? कितनी आवाज़ें दबाओगे? कब तक सच्चाई से भागोगे तुम कुछ नहीं हों सिर्फ़ वंशवाद का एक नमूना हो।

    — Kangana Ranaut (@KanganaTeam) September 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'तुमच्या वडीलांच्या चांगल्या कर्मामुळं संपत्ती तर मिळू शकते. मात्र, सन्मान तुम्हाला स्वत: कमवावा लागेल. तुम्ही माझं तोंड बंद करू शकता, पण त्यानंतर माझा आवाज लाखो लोकांमध्ये गर्जेल. किती जणांची तोंड बंद करणार? किती जणांचा आवाज दाबणार? किती वेळ सत्यापासून दूर पळांल. तुम्ही दुसरं काही नसून घराणेशाहीचा एक नमुना आहात'.

बंगला पाडल्यानंतर अनेक मराठी मित्रांनी फोन केल्याचा दावा कंगनाने केला आहे. 'माझे अनेक मराठी मित्र काल फोनवर रडले. अनेकांनी मला मदतीसाठी फोन नंबर दिले. अनेकांनी माझ्या घरी जेवण पाठवलं. मात्र, सुरक्षा नियमामुळे मी ते घेऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या या काळ्या करतुतीमुळं मराठी संस्कृती आणि स्वाभिमानाला जगात धोका पोहचायला नको, असेही ट्विट कंगनाने केलं आहे.

  • मेरे कई मराठी दोस्त कल फ़ोन पे रोए,कितनों ने मुझे सहायता हेतु कई सम्पर्क दिए, कुछ घर पे खाना भेज रहे थे जो मैं सिक्यरिटी प्रोटोकॉल्ज़ के चलते स्वीकार नहीं कर पायी,महाराष्ट्र सरकार की इस काली करतूत से दुनिया में मराठी संस्कृति और गौरव को ठेस नहीं पहुँचानी चाहिए. जय महाराष्ट्रा 🙏

काल(बुधवार) कंगनाने मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर संताप व्यक्त केला. तिने उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत टीका केली होती. 'उद्धव ठाकरे आज फिल्म माफियांसोबत मिळून माझं घर तोडलं आहे. हे वेळेचे चक्र असून उद्या तुमचं गर्वहरण होईल, हे लक्षात ठेवा. माझे घर पाडून तुम्ही माझ्यावर उपकार केले आहेत. आज मला काश्मिरी पंडितांना काय वाटलं असले, हे कळत आहे. मी फक्त अयोध्यावरच नाही तर काश्मीरवरही चित्रपट तयार करणार आहे. देशवासियांना जागरूक करणार आहे. माझ्यासोबत झालेल्या या क्रुरतेचा आणि दहशतवादाचा काही अर्थ आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र' असे कंगनाने व्हिडिओमध्ये म्हटलं होते.

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात उडी घेऊन व मुंबईवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर वादात सापडलेली अभिनेत्री कंगनाला केंद्र सरकारने 'वाय' दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. तिने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.