ETV Bharat / bharat

तुमच्या प्रेमाने भारावलोय, माझा मुलगा नक्की परत येईल -विंग कमांडर अभिनंदन यांच्या वडीलांचे भावनिक पत्र - सुखरूप

माझा मुलगा जिवंत आणि सुखरूप असल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो.

मिराज
author img

By

Published : Feb 28, 2019, 3:09 PM IST

नवी दिल्ली - भारताच्या हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या हातात सापडल्याने देशभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील प्रत्येक जण अभिनंदन सुखरूप परत यावेत, यासाठी प्रार्थना करत आहे. यावर आता अभिनंदनच्या वडिलांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय हवाई दलाचेच माजी अधिकारी असलेल्या अभिनंदनच्या वडिलांनी देशभरातून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.

माझा मुलगा जिवंत आणि सुखरूप असल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. या अडचणीच्या काळात देशवासियांनी दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे मी भारावून गेलो आहे. पाकिस्तानी सैन्याला तो सच्चा सैनिकाप्रमाणे धैर्याने सामोरे गेला. मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. तो सुखरूपरित्या घरी परत येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. बुधवारी पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत एक भारतीय पायलट त्यांच्या हाती लागल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली होती.

Intro:Body:

NASHIK 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.