ETV Bharat / bharat

अंबिकापूरच्या तुरुंग कल्याण अधिकारी बानी मुखर्जी यांनी घराचे रूपांतर केले बागेत - बानी मुखर्जी सरगुजा

सरगुजा जिल्ह्यातील अंबिकापुर तुरुंगात कल्याण अधिकारी या पदावर काम करणाऱ्या बानी मुखर्जी यांनी त्यांच्या घराचे रूपांतर एका बागेत केले आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ईटीव्ही भारतने त्यांचा उपक्रम लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न केलाय. मुखर्जी यांच्या बागेत फुलझाडांचा सोबत औषधी वनस्पती देखील पाहायला मिळतात.

house of bani mukhrjee
बानी मुखर्जी यांचे घर
author img

By

Published : Jun 5, 2020, 5:10 PM IST

सरगुजा(छत्तीसगड)- अंबिकापुर तुरुंगात कल्याण अधिकारी या पदावर काम करणाऱ्या बानी मुखर्जी यांनी त्यांच्या घराचे रूपांतर एका बागेत केले आहे. मुखर्जी यांचा हा प्रकल्प पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी काम करणाऱ्यापुढे आदर्शवत उदाहरण ठरला आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ईटीव्ही भारतने बानी मुखर्जी यांच्या उपक्रमाची दखल घेतली आहे .बानी मुखर्जी यांनी त्यांच्या घरात सर्वत्र फुलझाडे लावली आहेत. घराच्या छताचे रूपांतर एका बागेत केले आहे

रंगीबेरंगी फुल झाडांनी सुसज्ज घर

बानी मुखर्जी यांच्या घरी विविध प्रकारची फुलझाडे पहायला मिळतात. मुखर्जी हे सर्व पर्यावरण आणि निसर्ग यांच्याप्रती असलेल्या प्रेमापोटी करत आहेत. झाडे लावण्यासाठी तुमच्याजवळ मोठ्या प्रमाणात जमीन असणे गरजेचे नाही त्याऐवजी छोट्या छोट्या रोपांना घराच्या छतावर कुंडीत लाऊन बाग बनवता येईल,असे त्या सांगतात. मुखर्जी यांचे पती त्यांना या कामात मदत करतात आणि त्यांचे मनोबल वाढवतात.

युवकांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढे यावे

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी निसर्गातील वेगवेगळ्या प्रकारची झाडे वाचण्याची गरज आहे. झाडांच्या विविध प्रजातींचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज बानी मुखर्जी यांनी व्यक्त केली आहे.

बागेत औषधी वनस्पतींचा समावेश

बानी मुखर्जी यांनी त्यांच्या घरी फक्त शोभेची झाडे लावली नाहीत तर औषधी वनस्पती देखील लावल्या आहेत. शुगर, किडनी, डोळ्यांचे आजार यावरील उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या वनस्पती मुखर्जी यांच्या या घरातील बागेत पहायला मिळतात. मुखर्जी यांच्या घरातील बागेत कोरफड, कांदा, आले लसुन, टोमॅटो यासारख्या भाज्या लावण्यात आल्या आहेत. एका कुंडीत वडाचे झाड लावलेले पहायला मिळते

शहरांमध्ये छोट्या छोट्या घरात राहणाऱ्या लोकांकडे झाडे लावण्यासाठी जमीन उपलब्ध नसते त्यांच्यासाठी बानी मुखर्जी यांचा प्रयत्न आदर्शवत आहे घराच्या परिसरात छोटी छोटी झाडे लावल्यास आतील वातावरण सुंदर आणि प्रसन्न राहण्यास मदत होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.