नवी दिल्ली - गरोदरपणा आणि बाळंतपण या दोन गोष्टी स्त्रियांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या आहेत. बाळंतपण म्हणजे स्त्रिचा दुसरा जन्मच असल्यासारखे असते. बाळंतपणात होणाऱ्या असहनीय वेदना कशा कमी करता येईल यावर अनेक उपाय योजन्यात आले आहेत, आणि अजूनही यावर शोध सुरू आहे. प्रत्येक स्त्रिला तिचं बाळंतपण हे वेदनारहित व्हावे असे वाटते, कारण मातृत्वाच्या या टप्प्यात पोहोचायला तिला बाळंतपणात होणारा असह्य त्रास सहन करावा लागतो. मात्र, नवीन संशोधनानुसार आता पाण्याच्या मदतीने हा त्रास कमी करता येतो.
नवजात शिशुंवर करण्यात आलेल्या एका केस स्टडीनुसार, वॉटर बर्थ ही पद्धत म्हणजे बाळाला पाण्यात जन्म देणे. युएसमधील काही रुग्णालय किंवा बर्थ सेंटर ही पद्धत वापरण्याचा सल्ला देतात. कारण यामुळे नवजात बाळाला संक्रमण होण्याचे प्रमाण काही अशी कमी होते. संशोधनानुसार, पाण्यात बाळाला जन्म देताना मातेला होणारा लेबर पेनचा त्रास कमी होतो. तसेच बाळाला पाण्यात आईच्या गर्भाचा सहवास मिळतो. पाण्यामुळे शरीरातील रक्ताचा प्रवाह देखील सुरळीत होऊन जातो. वॉटर बर्थची संकल्पना ही विदेशातील आहे. भारतात अद्याप या पद्धतीने बाळंतपण केले जात नाही.
मिशीगन विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या विश्लेषणानुसार, ३९७ वॉटर बर्थ आणि २०२५ सामान्य बाळंतपणात वापरण्यात आलेल्या दोन्ही पद्धतींमध्ये जास्त बदल आढळून आला नाही. त्यामुळे वॉटर बर्थ आणि सामान्य बाळंतपण या दोन्ही पद्धती सुरक्षित आहेत. या दोन्ही प्रकारातील बाळंतपणात त्रास होतोच. मात्र, ऑपरेशनच्या तुलनेत वॉटर बर्थ कधीही चांगले असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पाण्यात बाळाला जन्म देताना महिलेला होणारा लेबर पेन(प्रसवपिडा)चा त्रास कमी होतो. फक्त वॉटर बर्थ आणि त्याबाबतची आपल्याला पुरेशी माहिती असायला हवी.
सह प्राध्यापक रूथ झेलिन्स्की यांच्यानुसार, वॉटर बर्थसाठी जास्त सुविधा देण्यात याव्यात तसेच या प्रक्रियेबाबतची संपूर्ण माहिती आधी देण्यात यावी. तर, काही वैद्यकीय संस्थांच्या मते, वॉटर बर्थमुळे गर्भवती स्त्रीचा लेबर पेनचा त्रास कमी होत असला तरी, ती बाळाच्या जन्मास त्याची पूर्ण मदत होऊ शकत नाही. जसे, एखाद्या रुग्णालयात वॉटर बर्थ नुसार बाळंतपण केल्या जात असेल तर, सदर महिलेला बाळ बाहेर येण्याच्या आत तिला पाण्याच्या टबच्या बाहेर काढायला हवे. कारण बाळाला पाण्यातून बाहेर काढल्यानंतरच तो पहिला श्वास घेतो. मात्र, त्याला बाहेर काढण्यात जरासा वेळ झाला तर त्याच्या फुफ्फुसांमध्ये पाणी भरू शकते. त्यामुळे याबाबत काळजी घेणे अतिशय गरजेचे असते. आई व बाळ या दोघांना पाण्यातून काढताना त्यांना उबदार कपड्यांनी झाकावे जेणेकरून बाळ आणि आई दोघांचीही संक्रमणापासून सुरक्षा होईल.
हेही वाचा - वर्तिका सिंह यांनी गृहमंत्र्यांना लिहलं रक्ताने पत्र , केली 'ही' मागणी
झेलिन्स्की यांच्या मते, वॉटर बर्थ प्रक्रियेला समजून घेण्याकरता आणखी संशोधन करण्याची गरज आहे. तसेच एखाद्या महिलेला बाळाला जन्म देण्याआधी साधी प्रक्रिया आणि वॉटर बर्थ बद्दल माहिती देणे ही गरजेचे आहे. जेणेकरून वॉटर बर्थबाबत तिच्यामनातील शंका दुर होतील. एका बाळाला जन्म देताना आईला अतोनात वेदना सोसाव्या लागतात, जर ह्या प्रक्रियेमुळे त्या काही प्रमाणात कमी होत असतील. तर, ही पद्धती आपण आत्मसात करायला काहीही हरकत असालया नको.
हेही वाचा - नागरिकत्व दुरूस्ती विधेयकविरोधी आंदोलन, गुवाहाटीत संचारबंदी शिथील