पणजी - गोवा राज्याची आर्थिक स्थिती सध्या नाजूक बनली आहे. सरकार खऱ्या स्थितीपासून लोकांना दूर ठेवण्यासाठी विविध मुद्दे पुढे आणत आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला.
गोवा विधानसभेत मंगळवारी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी भाषण केले. त्यानंतर चर्चेत सहभागी होताना विरोधी आमदारांनी सरकार पक्षावर प्रश्नांचा भडिमार केला. तसेच आर्थिक स्थितीबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. सत्ताधारी मंत्र्यांची वक्तव्ये पाहता ही स्थिती अधिक जाणवते. गोवा आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे, असा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा - उशीरा उठण्यावरून मेव्हणीसमोर टोमणा मारला म्हणून पत्नीची केली हत्या..
यावेळी सभागृहात बोलताना सरदेसाई म्हणाले, सरकारने म्हादई, खाण आणि पैसा कसा उभा करवा, याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. युवक रोजगार मागतात तर त्यांना राष्ट्रवाद सांगितला जातो. उद्योजक गाऱ्हाणी घेऊन आले तर त्यांना सीएए सांगितला जातो. सरकार काय करू पाहत आहे, हे स्पष्ट दिसत नाही. राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर सरकार जनतेकडून आर्थिक धोरण ठरविण्यासाठी जनतेकडून सूचना मागवते. मात्र, विरोधी पक्षातील आमदारांकडून मते अथवा सूचना मागवाव्यात, असे सरकारला वाटत नाही, असे सरदेसाई म्हणाले.
काँग्रेसचे फोंड्याचे आमदार रवी नाईक बोलण्यासाठी उभे राहिले असता, एक-दोन मंत्री वगळता अन्य कोणतेही मंत्री उपस्थित नव्वते. त्यामुळे आम्ही केवळ खुर्च्यांशी बोलावे का, असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - कलम ३७० : काश्मिरमधील आणखी दोन नेत्यांची सुटका, १६ मुख्य नेते अजूनही ताब्यात