नवी दिल्ली - ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचे दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.
जेठमलानी यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये कायदेमंत्री आणि शहर विकास मंत्री म्हणून काम पाहिले. ते बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्षही होते.
हेही वाचा - दिल्लीतील गांधी आश्रम आजही केंद्र सरकारकडून मदतीच्या प्रतिक्षेत...
जेठमलानी हे सहा वेळा राज्यसभेचे सदस्य राहिले. त्यांनी भाजप-प्रणित एनडीए मंत्रिमंडळात १९९८ ला प्रवेश केला. त्यानंतर ऑक्टोबर १९९९ मध्ये त्यांना पुन्हा संधी मिळाली. मात्र, त्यांनी जुलै २००० मध्ये वाजपेयी सरकारला रामराम ठोकला.
जेठमलानी यांनी वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी कायद्याची पदवी संपादन केली होती. त्यांनी भारताची फाळणी होईपर्यंत कराची येथे वकिली केली, अशी माहिती त्यांनी अधिकृत वेबसाईटवरून मिळत आहे.
हेही वाचा - विकास करा पण...वाचा महात्मा गांधींचे पर्यावरण अन् विकासाच्या मुद्द्यांवरील परखड मत
राम जेठमलानी यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. त्यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये बचावपक्षाची बाजू सांभाळली. यात विविध भ्रष्टाचाराच्या आणि घोटाळ्यांच्या खटल्यांचा समावेश आहे. यामध्ये लालू प्रसाद यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आणखी काही मोठे नेते समाविष्ट आहेत.