लखनऊ - उत्तर प्रदेशातील लखीमपूर भागात एक महिला आणि तिच्या मुलीला मानवी तस्करीपासून वाचवण्यात आले आहे. या दोघी मूळच्या छत्तीसगडच्या रहिवासी आहेत. लखीमपूरमधील एका समाजसेवकाने या मायलेकींची मदत केली.
दोन महिन्यांपूर्वी ही महिला कुटुंबात वाद झाल्या कारणाने घरातून निघून गेली होती. त्यानंतर तिची ओळख बिलासपूरमधील एका महिलेशी झाली. ती महिला पीडित महिलेला उत्तर प्रदेशला घेऊन आली. पीडित महिला रोजगार मिळवण्याच्या आशेवर दोन महिने या महिलेसोबत राहिली. मात्र, कालांतराने महिलेचा हेतू चांगला नसल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने आपल्या १० वर्षीय मुलीसह ते ठिकाण सोडले.
महिला आणि मुलीने कुष्ठरोग्यांसाठी असलेल्या आश्रमाचा आधार घेतला. मात्र, आरोपी महिला तेथेही वारंवार येत असे. कुष्ठरोग्यांच्या आश्रमाला नियमित भेट देणाऱया मोहन बाजपेयी यांच्या कानावर या महिलेची कहाणी गेली, त्यांनी या मायलेकींनी मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी या मायलेकींनी जवळच्या महिला मदत केंद्रात पाठवले.