ETV Bharat / bharat

'ऑर्डर ऑफ जायद' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने युएईने केला मोदींचा सन्मान - संयुक्त अरब अमिरात

पंतप्रधान मोदींना 'ऑर्डर ऑफ जायद' या युएईच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मोदी आणि क्रॉऊन प्रिंन्स
author img

By

Published : Aug 24, 2019, 9:49 AM IST

Updated : Aug 24, 2019, 3:19 PM IST

अबूधाबी - दोन दिवसीय फ्रान्स दौरा आटोपल्यानंतर पंतपधान नरेंद्र मोदी युएई (संयुक्त अरब अमिरात) मध्ये दाखल झाले आहे. शनिवारी अबूधाबीमध्ये पंतप्रधान मोदी क्रॉऊन प्रिंन्स शेख मोहम्मद बिन जायद यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींना 'ऑर्डर ऑफ जायद' या युएईच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दोन्ही नेते प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

  • Abu Dhabi: Prime Minister Narendra Modi conferred with Order of Zayed, UAE's highest civilian award by Crown Prince, Mohamed bin Zayed Al Nahyan. pic.twitter.com/tezAhEDtJU

    — ANI (@ANI) August 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काश्मीरप्रश्नी पाकिस्तान मुस्लीम राष्ट्रांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत असतानाच मोदींना युएईचा सर्वोच्च सन्मान मिळाल्याने पाकिस्तानला धक्का बसला आहे. काश्मीरप्रश्नी भारताने घेतलेला निर्णय चुकीचा नाही, असे युएईचे भारतातील दूतावास अहमद अल बन्ना यांनी म्हटले आहे. तसेच काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचेही युएईने मान्य केले आहे. देशातील प्रादेशिक असमानता संपवण्यासाठी भारताने काश्मीरच्या विभाजनाचा निर्णय घतला आहे. त्यात विशेष असे काही नाही, असेही बन्ना यांनी म्हटले आहे.

क्रॉऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद आणि मोदी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांमधील संबध वृद्धींगत करण्यासाठी मोदींना सर्वोच्च सन्मान देणार असल्याचे युइईने एप्रिलमध्ये जाहीर केले होते. हा सन्मान युएईचे संस्थापक शेख झायेद बिन सुलतान अल नाहयान यांच्या नावे दिला जातो. यावर्षी त्यांची १०० वी जयंती आहे.

महात्मा गांधीच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने दोन्ही देशांचे नेते एक टपाल टिकिट जारी करणार आहेत. तसेच कॅशलेस सेवेसाठी रुपे कार्डचे अनावरण करणार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा तिसरा युएई दौरा आहे. युएईला पोहचल्यानंतर मोदींनी खलीज टाईम्सला मुलाखत दिली.

भारत आणि युएईमधील व्यापार ६० बिलियन डॉलरवर पोहचला आहे. युएई हा भारताचा तिसरा सर्वात मोठी व्यपारातील भागीदार देश आहे. तसेच भारताला कच्चे तेल पुरवणाऱ्या देशांमध्ये युएईचा चौथा क्रमांक लागतो. युएईमध्ये ३३ लाख भारतीय नागरिक राहत आहेत. त्यामुळेही भारत आणि युएईमध्ये मैत्रीपूर्ण संबध आहेत.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 24, 2019, 3:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.