ETV Bharat / bharat

हैदराबाद, उन्नावनंतर आता रायपूर हादरलं, दिवसाढवळ्या चाकू हल्ल्यात २ तरुणींचा मृत्यू - death in raipur

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये दोन तरुणींवर अज्ञात व्यक्तीने दिवसाढवळ्या चाकू हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन्ही तरुणींचा मृत्यू झाला आहे.

raipur stabbing
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Dec 10, 2019, 3:48 PM IST

रायपूर - देशात महिलांविरोधातील हल्ले आणि अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत. उलट दिवसेंदिवस अंगाचा थरकाप उडवणाऱ्या घटना घडतच आहेत. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये दोन तरुणींवर अज्ञात व्यक्तीने दिवसाढवळ्या चाकू हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन्ही तरुणींचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - अश्लील व्हिडिओंमुळे तरूण चुकीच्या मार्गावर

हल्ल्यापूर्वी ३ ते ४ तरुण तरुणींच्या घरी आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना शहरातील टिकरापारा भागामध्ये घडली. मृत्यू झालेल्या दोन्ही तरुणींचे वय २० ते २२ च्या दरम्यान आहे. जखमी अवस्थेत दोघींना आंबेडकर रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, त्यापूर्वीच दोघींचा मृत्यू झाला होता. दोघींच्या शरिरावर आणि गळ्यावर चाकूने वार करण्यात आले आहेत.

हेही वाचा - हैदराबाद एन्काऊंटर; आज उच्च न्यायालयात होणार सुनावणी

मृतांमधील एक तरुणी टीकरापारा भाागामध्ये २ वर्षांपासून भाड्याच्या खोलीत एकटी राहत होती. तसेच त्यातील एक तरुणी नर्सिंगचे शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेनंतर घरमालकाने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास करत आहेत.

Intro:Body:

हैदराबाद, उन्नावनंतर आता रायपूर हादरलं, दिवसाढवळ्या चाकू हल्ल्यात २ तरुणींचा मृत्यू

रायपूर - देशात महिलांविरोधातील हल्ले आणि अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत. उलट दिवसेंदिवस अंगाचा थरकाप उडवणाऱ्या घटना घडतच आहेत. छत्तीसगडची राजधानी  रायपूरमध्ये दोन तरुणींवर अज्ञात व्यक्तीने दिवसाढवळ्या चाकू हल्ला झाला. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन्ही तरुणींचा मृत्यू झाला आहे.

हल्ल्यापूर्वी ३ ते ४ युवक तरुणींच्या घरी आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना शहरातील टिकरापारा भागाममध्ये घडली.  मृत्यू झालेल्या दोन्ही युवतींचे वय २० ते २२ च्या दरम्यान आहे. जखमी अवस्थेत दोघींना आंबेडकर रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, त्यापूर्वीच दोघींचा मृत्यू झाला होता. दोघींच्या शरिरावर आणि गळ्यावर चाकूने वार करण्यात आले आहेत.

मृतांमधील एक तरुणी टीकरापारा भाागामध्ये २ वर्षांपासून भाड्याच्या खोलीत एकटी राहत होती. तसेच त्यातील एक युवती नर्सिंगचे शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेनंतर घरमालकाने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास करत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.