ETV Bharat / bharat

ट्रम्प यांच्या आग्रा भेटीदरम्यान रेल्वे गाड्यांना "नो एन्ट्री" - आग्रा

डोनल्ड ट्रम्प यांचे खेरिया विमानतळावर दुपारी 4.45 वाजता आगमन होणार आहे. ते सायंकाळी 7च्या सुमारास परतणार आहेत. या कालावधीत आग्रा कॅन्ट रेल्वे स्थानकामध्ये एकाही रेल्वे गाडीचे आगमन होणार नाही.

आग्रा रेल्वे स्थानक
आग्रा रेल्वे स्थानक
author img

By

Published : Feb 24, 2020, 10:25 AM IST

लखनौ - जगप्रसिद्ध ताजमहालची भुरळ कोणाला पडणार नाही? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेदेखील यास अपवाद नाहीत. ते सपत्निक आज ताजमहाल पाहायला जाणार आहेत. ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यात विशेष म्हणजे, ट्रम्प यांचे वास्तव्य असलेल्या कालावधीत आग्रा रेल्वे स्थानकात एकही रेल्वे प्रवेश करणार नाही.

ट्रम्प यांचे खेरिया विमानतळावर दुपारी 4.45 वाजता आगमन होणार आहे. ते सायंकाळी 7 च्या सुमारास परतणार आहेत. या कालावधीत आग्रा रेल्वे स्थानकामध्ये एकाही रेल्वे गाडीचे आगमन होणार नाही. सर्व रेल्वे गाड्या बाहेरच थांबविण्यात येणार आहेत. विमानतळापासून ताजमहालपर्यंतच्या प्रवासादरम्यान रेल्वेच्या आवाजाचा ट्रम्प यांना त्रास व्हायला नको, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

हेही वाचा -'ट्रम्प यांच्या दौऱ्याचा भारताला काही फायदा नाही'

रेल्वे गाड्यांसंदर्भात आरपीएफचे कमांडन्ट प्रकाश पांडा यांना आग्र्याचे एसएसपी यांनी पत्र पाठविले आहे. प्रवाशांची सुरक्षा ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. यासाठी आम्ही सर्व तयारी केलेली आहे. व्हीआयपी भेटीदरम्यान ते आमच्या हद्दीतून ज्या ठिकाणावरुन निघतील, तेथे विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे, असे पांडा यांनी सांगितले.

हेही वाचा - नमस्ते ट्रम्प...! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आजपासून भारत दौऱ्यावर, अहमदाबादमध्ये जय्यत तयारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.