ETV Bharat / bharat

Top 10 @ 7 PM : सायंकाळी सातच्या दहा ठळक बातम्या!

author img

By

Published : May 7, 2020, 7:03 PM IST

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Top ten news at seven PM
Top 10 @ 7 PM : सायंकाळी सातच्या दहा ठळक बातम्या!
  • मुंबई - महापालिकेच्या सायन रुग्णालयात कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांच्याबाजूला रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा व्हिडिओ आमदार नितेश राणे यांनी ट्विट केला होता. याची दखल घेत या व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. याप्रकरणी चौकशी समितीने 24 तासात अहवाल मागवला असून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी दिली.

सविस्तर वाचा : सायन रुग्णालय प्रकरणी चौकशी समितीची स्थापना, दोषींवर होणार कारवाई

  • नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सीमा सुरक्षा दलाच्या(बीएसएफ) दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. जवानांच्या मृत्यूनंतर बीएसएफ मुख्यालयाने दु:ख व्यक्त केले आहे. कोरोना संकटाच्या काळात बीएसएफचे जवान स्थानिक पोलिसांबरोबर काम करत आहेत. त्यामुळे अनेकांना संसर्ग होत आहे.

सविस्तर वाचा : बीएसएफच्या दोन जवानांचा कोरोनामुळे मृत्यू; मागील २४ तासांत ४१ जवान बाधित

  • बुलडाणा - नागपूरच्या कामठी येथील आणि सध्या बुलडाण्यात अडकलेल्या तबलिगी जमातच्या 11 सदस्यांच्या कोरोना चाचणीत तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यातील एका 75 वर्षीय रुग्णाच्या अहवालामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. या रुग्णाच्या एकाच स्वॅब नमुन्यातून कोरोनाचे दोन वेगवेगळे चाचणी अहवाल अकोला येथील ल‌ॅबमधून प्राप्त झाले. यातील एक अहवाल पॉझिटिव्ह तर एक अहवाल निगेटिव्ह होता. तसेच ईटीव्ही भारतने सर्वप्रथम हा प्रकार उघडकीस आणला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर कोरोना तक्रार निवारण समितीच्या नोडल अधिकारी गौरी सावंत यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

सविस्तर वाचा : ईटीव्ही भारतच्या बातमीची दखल; एका स्वॅबच्या दोन वेगवेगळ्या रिपोर्टप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

  • नागपूर - कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळपासून तब्बल ४३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले आहे. काल रात्री 44 रुग्णांना कोरोना झाल्याचे निदान झाले होते, त्यामुळे गेल्या 24 तासात एकूण 87 रुग्णांची वाढ झाली आहे.

सविस्तर वाचा : चिंताजनक..! गेल्या 24 तासात नागपुरात एकूण 87 रुग्णांची वाढ

  • पुणे - राज्यातल्या कोरोना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणामध्ये पुणे शहर प्रमुख आहे. पुणे शहरातील कोरोना संसर्गाचा वेग चिंताजनक आहे. केंद्रीय पथकाच्या निरीक्षणानुसार शहरातल्या कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 7 दिवसात दुप्पट होत असल्याचे नुकतेच स्पष्ट करण्यात आले होते. एकीकडे पुणे शहरातील ही चिंताजनक बाब असताना दुसरीकडे गेल्या काही दिवसात एक समाधानकारक बाबही समोर आली आहे. गेल्या 7 दिवसापासून पुण्यात दररोज 50 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे होत आहेत.

सविस्तर वाचा : दिलासादायक..! पुण्यात गेल्या 7 दिवसात दररोज 50 पेक्षा जास्त जण कोरोनामुक्त

  • मुंबई - लॉकडाऊनमुळे नागरिकांना सण, उत्सव, जयंत्या घरातच साजऱ्या कराव्या लागत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आपल्या कलेच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. पक्षांच्या पिसांवर काम करुन आपली वेगळी ओळख निर्माण करणारे निलेश चौहान यांनी अशाच पद्धतीने पिसावर गौतम बुद्ध यांची प्रतिमा रेखाटली आहे. आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त त्यांनी या अनोख्या पद्धतीने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. पक्षांचे हे पंख त्यांनी ज्यांच्याकडे पाळीव पक्षी आहेत, त्यांच्याकडून घेतले आहेत.

सविस्तर वाचा : ईटीव्ही भारत विशेष : 'पिसावर कोरली बुद्ध प्रतिमा" कलाकाराकडून अनोख्या पद्धतीने अभिवादन

  • सुरत (गुजरात) - सुरतमधल्या पालिगाम भागातील सचिन इंड्स्ट्री परिसरात एक स्थानिक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तेथील संपूर्ण भाग पोलिसांनी सील केला होता. मात्र, त्यानंतर नागरिकांनी पोलिसांशी सहकार्य न करता त्यांच्याशी बाचाबाची सुरू केली. काही काळानंतर वातावरण तापले आणि लोकांनी पोलिसांवरच दगडफेक केली होती. याप्रकरणात 15 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अशी माहिती पोलीस उपआयुक्त विधी चौधरी यांनी दिली.

सविस्तर वाचा : पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी सुरतमध्ये 15 जण ताब्यात

  • वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा कोरोना विषाणूवरून चीनवर निशाणा साधला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पर्ल हार्बर हल्ला आणि 9/11 च्या हल्ल्याशी कोरोना संकटाची तुलना केली आहे. कोरोना विषाणू संकट हे पर्ल हार्बर आणि 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यांपेक्षा वाईट आहे. ही महामारी चीनपेक्षा अमेरिकेची शत्रू आहे, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

सविस्तर वाचा : 'कोरोना विषाणू हे पर्ल हार्बर अन् 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यांपेक्षा वाईट'

  • मुंबई - पुढच्या जन्मी लग्न करशील का? असे विचारणाऱ्या चाहत्याला अभिनेत्री रविना टंडनने तितक्या मिश्किलपणे उत्तर दिले आहे. रविनाने बुधवारी इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटो शेअर केला होता. सुंदर पर्वतावरील या फोटोवर अनेक चाहत्यांनी आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सविस्तर वाचा : हजरजबाबी रवीना! लग्नाची मागणी घालणाऱ्या फॅनला रविनाने दिले 'हे' उत्तर

  • नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. या कालावधीत दारूची दुकानेही बंद असल्याने तळीरामांची मोठी आफत झाली. दारूची दुकाने उघडण्याचे आदेश दिल्यानंतर दारूच्या दुकानासमोर लांबच्या लांब रांगा लागत असल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा पुरता बोजवारा उडाला. हे लक्षात घेता ऑनलाईन खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या झोमॅटो दारूची होम डिलिव्हरी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पिरिट्स अँड वाईन असोसिएशन ऑफ इंडियाला (आयएसडब्ल्यूएआय) प्रस्ताव दिला आहे.

सविस्तर वाचा : तळीरामांसाठी आनंदाची बातमी, झोमॅटो दारूची होम डिलिव्हरी करणार...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.