- धुळे - येथील महामार्ग क्रमांक ६ वरील फागणे-कासविहिर शिवारात केमिकल घेऊन जाणार कंटेनर व ट्रॅव्हल्स बस यांची भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांनी पेट घेतला. यामुळे त्यात जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सविस्तर वाचा - इंडियन ऑईल गॅस टँकर-ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; वाहनांच्या स्फोटाचा दोन किमीपर्यंत आवाज
- हैदराबाद - ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे रविवारी रात्री निधन झाले. लोकशाहीच्या गुन्हेगारीकरणापासून श्रद्धेच्या बाजारीकरणापर्यंत, समाजाच्या सांस्कृतिक फुटकळीकरणापासून शासनाच्या निगरगट्टीकरणापर्यंत, साहित्यिकांच्या बोटचेपेपणापासून साहित्यिक व्यासपीठांवर असांस्कृतिक उठाबशापर्यंत अनेक ज्वलंत प्रश्नांवर मतकरी स्वत:ची भूमिका परखडपणे मांडत राहिले. प्रश्न राजकारण्यांच्या मुजोरीपणाचा असो, नर्मदा आंदोलनाचा असो किंवा अंधश्रद्धेचा, त्या प्रश्नांवर व्यक्त होणे मतकरींना कायमच आपली सामाजिक बांधिलकी वाटत आली. पाहूयात, 'ईटीव्ही'ने वृत्तवेधच्या दिवाळी विशेष या कार्यक्रमाच्या माध्यमातून 2 नोव्हेंबर 2005 रोजी घेतलेली त्यांची मुलाखत..
सविस्तर वाचा - 'मतकरींशी गप्पा - आठवणींना उजाळा'
- मुंबई - कोरोनाचे आकडे ऐकून चिंतेत असलेल्या मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईत पहिली कोरोनाबाधित रुग्णावरील प्लाझ्मा थेरपी अखेर यशस्वी ठरली आहे. मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली होती. हा रुग्ण आता ठणठणीत झाला असून त्याला दोन ते तीन दिवसांत डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.
सविस्तर वाचा - गुड न्यूज ! मुंबईत प्लाझ्मा थेरपी यशस्वी, नायरमधील रुग्ण झाला बरा
- मुंबई- राज्यात कोरोना संक्रमण वाढत असून यावर उपाययोजना करण्यात येत आहेत. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करता यावे यासाठी राज्यात रस्त्यावर पोलीस 24 तास उभे असून याचा फटका पोलीस खात्याला बसला आहे. यामुळे पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी केंद्राकडे 20 सशस्त्र पोलीस तुकड्या पाठवण्याची मागणी केली होती. 10 सशस्त्र पोलिसांच्या तुकड्या राज्यात दाखल झाल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले आहे.
सविस्तर वाचा - राज्यात सशस्त्र पोलीस दलाच्या 10 तुकड्या दाखल; अनिल देशमुख यांची माहिती
- सोलापूर - गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने यांना अखेरचा निरोप देण्यात आला. पंढरपूर तालुक्यातील पुळूज गावात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सविस्तर वाचा - शूरवीर शहीद धनाजी होनमाने यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली - देशाचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. स्थलांतरीत मजुरांना घरी पोहचवण्यासाठी लष्कराची मदत घ्यावी, अशी मागणी करत ते दिल्लीतील राजघाटवर आंदोलन करत होते.
सविस्तर वाचा - माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना अटक!
- बेंगळूरू - लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच कर्नाटक सरकारने मोठी घोषणा केली आहे. बी. एस. येडीयुरप्पा यांनी गुजरात, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू या राज्यांतील लोकांना ३१ मेपर्यंत कर्नाटकात येण्यास प्रवेश नाकारला आहे.
सविस्तर वाचा - महाराष्ट्रासह अन्य चार राज्यांतील नागरिकांना ३१ मेपर्यंत कर्नाटकात प्रवेश नाही
- नवी दिल्ली - सरकारने पुन्हा सुधारित व्यापक आर्थिक पॅकेज घोषित करावे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केली आहे. ते माध्यमांशी व्हिडिओद्वारे पत्रकार परिषदेत बोलत होते. आर्थिक प्रोत्साहनपर घोषित केलेले पॅकेज हे निराशाजनक आणि अपुरे असल्याचीही त्यांनी टीका केली आहे.
सविस्तर वाचा - केंद्र सरकारने पुन्हा सुधारित आर्थिक पॅकेज घोषित करावे- काँग्रेसची मागणी
- नवी दिल्ली - कोरोना आणि टाळेबंदीचा फटका खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांना बसत आहे. वुईवर्क इंडियाच्या २० टक्के कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे. ही कंपनी एकाच ठिकाणी विविध कंपन्यांना काम करण्यासाठी कार्यालय उपलब्ध करून देते.
सविस्तर वाचा - वुईवर्क इंडियांच्या २० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा
- नवी दिल्ली - सोन्याचे दर फ्युच्युअर ट्रेडमध्ये प्रति तोळा ४७९ रुपयांनी महागले आहेत. त्यामुळे सोने प्रति तोळा ४७,८६० रुपयावर पोहोचले आहे. स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा दर प्रति तोळा ५० हजार रुपयापर्यंत पोहोचले आहेत.
सविस्तर वाचा - सोने महागले! जाणून घ्या, आजचा दर