नवी दिल्ली - सचिन पायलट यांना राजस्थान काँग्रेस कमिटी अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर पायलट हे पक्षात राहणार की नाही. यावर त्यांनी स्वत: अजून सांगितले नाही. मात्र, त्यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये येतील, अशी अशा काँग्रेसच्या उच्चस्तरीय नेत्यांना वाटत आहे. बंडखोर आमदार आणि पायलट यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये यावे. तसेच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सुद्धा परिस्थिती कठीण होईल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया टाळाव्यात, असे काँग्रेसधील नेत्यांनी त्यांना बजावले आहे.
राजस्थान विधानसभा अध्यक्षांनी सचिन पायलट यांच्यासमवेत त्यांच्यासोबतच्या इतर आमदारांना नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये त्यांना मुदतीच्या आत उत्तर देणे गरजेचे आहे. नाहीतर त्यांची आमदारकी रद्द होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, पायलट यांनी हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयामध्ये नेले आहे. त्याची आज दुपारी 1 वाजता सुनावणी होणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पायलट यांची काँग्रेसमध्ये परत येण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या दक्षिण भारतातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली आहे. मात्र, पायलट यांच्याकडून यावर प्रकाश टाकण्यात आलेला नाही. वरिष्ठ नेत्यांनी पायलट यांना काँग्रेसमध्ये पुन्हा येण्याच आग्रह केला आहे मात्र कुठल्याही अटीविना. मात्र, पायलट यांनी अजूनही काँग्रेमधून बाहेर पडल्याची माहिती दिलेली नाही.