ETV Bharat / bharat

तिहार तुरुंगात सहाय्यक अधीक्षकांना कोरोनाची बाधा

author img

By

Published : May 25, 2020, 9:47 AM IST

तिहार तरुंग प्रशासनाच्या 45 वर्षीय सहाय्यक अधीक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी समोर आले. तिहार तुरुंगात पहिल्या कोरोना विषाणू प्रकरणाची नोंद झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Tihar Jail reports first COVID-19 case
Tihar Jail reports first COVID-19 case

नवी दिल्ली - तिहार तुरुंगामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. तुरुंग प्रशासनाच्या 45 वर्षीय सहाय्यक अधीक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी समोर आले. तिहार तुरुंगात पहिल्या कोरोना विषाणू प्रकरणाची नोंद झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सेंट्रल जेल नं. 7मध्ये तैनात सहाय्यक अधीक्षक हे तिहार कारागृहातील कर्मचारी निवासी संकुलातील रहिवासी आहेत. त्यांनी कुटुंबीयांची भेट घेण्याकरीता शुक्रवारी सुट्टी घेतली होती. मात्र, घरी जाण्यापूर्वी 22 मे रोजी आम्रपाली रुग्णालयात स्वत:ची कोरोना चाचणी करून घेतली. तेव्हा ते कोरोनाबाधित आढळले आहेत.

त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तिहार तुरुंग प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्याशी जवळचा संबंध आलेल्या तुरुंगातील कर्मचाऱ्यांची चाचणी घेण्यात आली आहे. अद्याप त्याचा कोरोना अहवाल आला नसून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच खबरदारी म्हणून, त्यांच्या शेजारी राहणारे 9 जण दिल्लीतील वेगवेगळ्या तुरुंगातही काम करतात, त्यांना सर्वांना क्वारंटनाईन होण्यास सांगतिले आहे. तथापि, रोहिणी तुरुंगातील 18 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.