ETV Bharat / state

22 वर्षीय तरुणाचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू, स्थानिकांचा पोलीस ठाण्याला घेराव - Accused Death In Judicial Custody - ACCUSED DEATH IN JUDICIAL CUSTODY

Accused Death In Judicial Custody : मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात तणावपूर्ण वातावरण आहे. स्थानिक नागरीकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला आहे. नेमकं काय घडलंय? वाचा सविस्तर...

Accused Death In Judicial Custody
तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2024, 8:05 PM IST

Updated : Sep 24, 2024, 10:52 PM IST

मुंबई Accused Death In Judicial Custody : आर्थर रोड कारागृहात 22 वर्षीय तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. न्यायालयीन कोठडीत असताना तरुणाचा मृत्यू झाल्यानं येथील वातावरण तापलं आहे. आरोपीला पॉक्सो प्रकरणात अटक करण्यात आली होती. आरिफ कुरेशी असं या आरोपी तरूणाचं नाव आहे.

पोलीस ठाण्याला स्थानिकांचा घेराव : न्यायालयीन कोठडीत असताना कुरेशीची प्रकृती बिघडल्यानं त्याला जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान दोन दिवसांतच कुरेशीचा मृत्यू झाला. आरोपी तरूणाच्या मृत्यूनंतर काळाचौकी पोलीस ठाण्याला संतप्त स्थानिकांनी घेराव घातला आहे.

स्थानिकांचा पोलीस ठाण्याला घेराव (Source - ETV Bharat Reporter)

आरिफनं नेमका काय गुन्हा केला होता? : याप्रकरणी एन.एम जोशी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. तसंच पुढील तपास सुरू असल्याची माहिती एन.एम जोशी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांनी दिली. आरिफ कुरेशी हा गेल्या काही महिन्यांपासून एका 16 वर्षीय मुलीचा पाठलाग करत होता. तसंच तो त्याच्या मित्रांसोबत देखील त्या मुलीची छेड काढत होता. याप्रकरणी 16 सप्टेंबर रोजी काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच दिवशी पोलिसांनी त्याला अटक केली होती.

फिट आल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं : काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांनी माहिती दिली की, कुरेशीला 20 सप्टेंबर रोजी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 22 सप्टेंबर रोजी अचानक फिट आल्यानं कुरेशीला जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आज कुरेशी यांचा जे.जे रुग्णालयात मृत्यू झाला. आरोपी कुरेशीला अंमली पदार्थांचं व्यसन असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा

  1. 'एक मराठा लाख मराठा'; आक्रमक मराठा आंदोलकांनी तहसीलदाराची पेटवली खुर्ची, पाहा व्हिडिओ - Maratha Reservation
  2. "अक्षय शिंदे एन्काऊंटर संपूर्णपणे फेक तसेच स्क्रिप्टेट; कोर्टात जाणार" - Akshay Shinde Encounter
  3. नोकरीच्या अमिषानं घेतले तरुणाचे कागदपत्रं; बँक खाते काढून 380 कोटी रुपयाचा गोलमाल; भामट्यांविरोधात गुन्हा - Fraud with Youth For Given Job Lure

Last Updated : Sep 24, 2024, 10:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.