ETV Bharat / bharat

धक्कादायक..! जमशेदपूरात ३ वर्षीय बालिकेचे अपहरण; बलात्कारानंतर कापले  'शिर'

२५ जुलैला झालदा गावाची राहिवासी असलेल्या महिलेच्या मुलीची चोरी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच परिसरात तणाव निर्माण झाला होता. आरोपीला बघून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Aug 1, 2019, 6:45 PM IST

जमशेदपूर - टाटानगर रेल्वे स्थानकावरुन २५ जुलैला रात्री ३ वर्षीय बालिकेचे अपहरण करण्यात आले होते. या मुलीचे शिर कापलेले शरीर रेल्वे पोलिसांना सापडले आहे. यामुळे, बलात्कार करुन मुलीचे शिर कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

टाटानगर रेल्वेचे जिल्हा अधीक्षक नुर मुस्तफा यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जुलैला झालदा गावाची राहिवासी असलेल्या महिलेच्या मुलीची चोरी झाली होती. चोरीच्यावेळी मुलीसोबत आई आणि तिचा सहकारी होता. पोलिसांनी घटनेची नोंद करुन चौकशी केली. चौकशीदरम्यान, सहकारी असलेला मोनू चुकीची माहिती देत होता. यामुळे, पोलिसांनी मोनूला जेलमध्ये टाकले आहे. तर, मुलीच्या आईला देखरेखीखाली ठेवावे लागले आहे.

सीसीटीव्हीच्या आधारे तपास केल्यानंतर पोलिसांनी २८ जुलैला टेल्को पोलीस ठाणे क्षेत्रात रामधीन बगान येथे राहत असलेल्या रिंकू साव याला अटक केली. पोलिसांनी रिंकू सावची कसून चौकशी केल्यानंतर त्याने काशीडाह येथे राहणाऱ्या कैलाश कुमारसोबत मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी रिंकूने सांगितलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरुन मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात तणाव निर्माण झाला होता. आरोपीला बघून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. सध्या इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलीस छापेमारी करत आहेत.

याआधीही रिंकू साव याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये मुले चोरीचे गुन्हे दाखल आहेत. याआधीही तो जेलमध्ये गेला आहे. महत्वाची बाब म्हणजे, रिंकू साव याची आई गिरिडाग ठाण्यामध्ये पोलीस आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.