हैदराबाद - तेलंगाणामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. गुरुवारी एकाच दिवसात २२ नवीन रुग्ण समोर आले असून तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २८ झाली आहे.
मृत्यू झालेल्यांमध्ये एका ४४ वर्षीय महिलेचा आणि ४८ व ७६ वर्षीय दोन पुरुषांचा समावेश आहे. हे तिघेही ग्रेटर हैदराबादचे रहिवासी होते. मागील काही दिवसांमध्ये तेलंगाणातील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये घट झाली होती. मात्र, गुरुवारी हा आकडा २२ने अचानक वाढला असून राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ हजार ३८ झाली आहे.
-
Media bulletin on status of positive cases of #COVID19 in Telangana (Dated: 30.04.2020) pic.twitter.com/av2xazv6Zp
— Eatala Rajender (@Eatala_Rajender) April 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Media bulletin on status of positive cases of #COVID19 in Telangana (Dated: 30.04.2020) pic.twitter.com/av2xazv6Zp
— Eatala Rajender (@Eatala_Rajender) April 30, 2020Media bulletin on status of positive cases of #COVID19 in Telangana (Dated: 30.04.2020) pic.twitter.com/av2xazv6Zp
— Eatala Rajender (@Eatala_Rajender) April 30, 2020
मलकपेटमधील तीन दुकानदारांना दोन कोरोनाबाधित नागरिकांमुळे कोरोनाची लागण झाली. दुकानदारांमुळे त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाची बाधा झाली असून सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मलकपेट कन्टेमेंट झोन घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री ई. राजेंदर यांनी दिली.
दरम्यान, गुरुवारी ३३ कोरोनाबाधिक पूर्णपणे बरे झाले असून त्यात एका ५० वर्षीय डॉक्टरचाही समावेश आहे. आत्तापर्यंत ४४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ५६८ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तत्काळ एक उच्चस्तरीय बैठक घेतली.