ETV Bharat / bharat

INX मीडिया प्रकरण : पी. चिदंबरम यांच्या जामीन याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय - पी. चिंदबरम बातमी

काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या (बुधवारी) निर्णय देणार आहे.

पी. चिदंबरम
पी. चिदंबरम
author img

By

Published : Dec 3, 2019, 8:49 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या (बुधवारी) निर्णय देणार आहे. आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दाखल केलेल्या मनी लाँड्रीगच्या गुन्ह्यात ते तिहार तुरुंगामध्ये आहेत. त्यामुळे चिंदबरम यांना जामीन मिळणार की तुरुंगातील रवानगी आणखी वाढणार हे उद्या स्पष्ट होणार आहे.

  • Supreme Court to pronounce its verdict on bail plea of former Finance Minister and Congress leader P Chidambaram (file pic), tomorrow, in INX Media money laundering case registered by the Enforcement Directorate (ED). pic.twitter.com/gMo9mLJ4Ar

    — ANI (@ANI) December 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
आयएनएक्स माध्यम गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयनेही चिदंबरम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यातून त्यांना जामीन मिळाला होता. मात्र, ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यातून त्यांना दिलासा मिळाला नाही. मागील आठवड्यात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी तिहार तुरुंगात जाऊन भेट घेतली होती.

Intro:Body:

INX मीडिया प्रकरण : पी. चिंदंबरम यांच्या जामीन याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय   

नवी दिल्ली - काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिंदबरम यांच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या(बुधवारी) निर्णय देणार आहे. आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी ते तिहार तुरुंगामध्ये आहेत. त्यामुळे चिंदबरम यांना जामीन मिळणार की तुरुंगातील रवानगी आणखी वाढणार हे उद्या स्पष्ट होणार आहे.

आयएनएक्स माध्यम गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयनेही चिदंबरम यांच्या विरोधाच गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यातून त्यांना जामीन मिळाला होता. मात्र, ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यातून त्यांना दिलासा मिळाला नाही. मागील आठवड्यात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी तिहार तुरुंगात जाऊन भेट घेतली होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.